Join us

Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, २ स्टॉक्सला लागलं अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 1:33 PM

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी वाढ दिसून आली.

अदानी समूहाच्या (Adani Group Shares) शेअर्समध्ये तेजीचं सुरूच आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच गुरुवारी मोठी वाढ दिसून आली. अदानी समूहाच्या दोन कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किटही लागलं. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये या आठवड्यात तेजी पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच बुधवारीही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली होती. यादरम्यान, अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांचे तेजीसह उघडले.

२४ जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्सना रोज लोअर सर्किट लागत होतं. अनेक शेअर्सनं विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. आता अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. समूहाच्या समभागांनी जबरदस्त पुनरागमन केलंय. अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या कंपन्यांच्या शेअर्सची आजची काय स्थिती आहे ते जाणून घेऊया.

या शेअर्सना अप्पर सर्किटगुरुवारी कामकाजादरम्यान अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरला अप्पर सर्किट मारणाऱ्या समभागांपैकी एक आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स ९८२.३५ रुपयांवर पोहोचले. तर अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांची वाढ होऊन शेअर्स ९८२.०५ रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. तर अदानी पॉवरच्याही शेअरमध्ये वाढ झाली. अदानी समुहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये मात्र घसरण दिसून आली.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार