Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

BEST उपक्रमातील 'अ‍ॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर'साठी लावली यशस्वी बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:32 PM2022-10-20T15:32:30+5:302022-10-20T15:33:07+5:30

BEST उपक्रमातील 'अ‍ॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर'साठी लावली यशस्वी बोली

Adani Transmission Limited Appointed as Partner for Advanced Meter Infrastructure by Mumbai BEST Enterprise | Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

Adani Group , BEST Mumbai: बेस्ट उपक्रमाकडून नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या प्रगत मीटर संरचना (अ‍ॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर - एएमआय) सेवेच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया घेण्यात आली. त्यात अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ही यशस्वी बोली लावणारी कंपनी ठरली. कंपनीच्या वितरण मंचाकडून 'डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑन-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीफूट)' तत्त्वावर हा स्मार्ट मीटरिंग प्रकल्प राबवला जाणार आहे. मिळालेल्या कंत्राटाचा भाग म्हणून, १०.८० लाख स्मार्ट मीटर आणि त्या संबंधित संप्रेषण आणि क्लाउड पायाभूत सुविधा ३० महिन्यांच्या कालावधीत स्थापित केली जाणार आहे. तसेच पुढील ९० महिन्यांसाठी त्यांची देखभालही केली जाईल. या प्रकल्पामध्ये वितरण पायाभूत सुविधा आणि बेस्ट उपक्रमाच्या अंतिम ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंगचा समावेश असेल. त्यामुळे वीजविषयक हिशेब अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ग्राहकांना विजेच्या वापराच्या पद्धतींवर ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक वाटल्यास त्वरित सुधारणा करण्याच्या दिशेने स्मार्ट मीटर फायद्याचे ठरतील. ज्या गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींनी छतावरील सौर विजेच्या सुविधा स्थापित केली आहे, त्यांना प्री-पेड बिलिंग आणि नेट-मीटरिंग सुविधेची निवड करण्याचा पर्यायदेखील स्मार्ट मीटरमध्ये असेल. दूरस्थ स्वरूपात जोडणी आणि बीलाचे पेमेंट न करणाऱ्या ग्राहकांची विजपुरवठा खंडित करण्याची क्षमताही बेस्ट उपक्रमाकडे यातून येईल. स्मार्ट मीटर हे नियामकांना ग्राहकांसाठी अनुकूल दिवसाच्या वेळेप्रमाणे शुल्करचना करण्यास आणि वीज वितरणात एकूण कार्यक्षमता वाढविण्यास सक्षम करतात.

अदानी ट्रान्समिशनच्या वितरण मंचाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कंदर्प पटेल म्हणाले, “आम्ही आमच्या वितरण मंचाअंतर्गत  स्पर्धात्मक बोली प्रक्रियेतून आमचा पहिला स्मार्ट मीटरिंग प्रकल्प मिळवल्यामुळे आणि बेस्ट उपक्रमासोबत विश्वासार्ह भागीदारी सुरू केल्यामुळे आमच्यासाठी हे आणखी एक सकारात्मक पुढचे पाऊल आहे. हा प्रकल्प तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनची क्षमता पुरेपूर खुली करून ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा (Value Added Services) देण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बेस्ट उपक्रम आणि त्यांच्या ग्राहकांना डिजिटलायझेशनच्या संभाव्यतेचा पुरेपूर फायदा करून देण्यासाठी हा प्रकल्प वेळेत अपेक्षेनुसार पूर्ण केला जाण्याचा आम्हाला विश्वास आहे.”

अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) बद्दल-

अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (एटीएल) ही अदानी समूहातील पारेषण आणि वितरण व्यवसाय शाखा आहे. ATL सध्या १८,७९५ सीकेएमच्या संचयी पारेषण जाळ्यासह देशातील पारेषण क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. यापैकी १५,००३ सीकेएम जाळे कार्यरत आहे आणि ३,७९२ CKM हे बांधकामाच्या विविध टप्प्यांवर आहे. एटीएल मुंबई आणि मुंद्रा सेझच्या एक कोटी २० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणारा वितरण व्यवसाय देखील चालवते. भारताची ऊर्जेची गरज येत्या काही वर्षांत चौपट होणार आहे. ATL एक मजबूत आणि विश्वासार्ह विजेचे पारेषण जाळे तयार करण्यासाठी आणि किरकोळ ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी ऊर्जा’ हे उद्दिष्ट्य साध्य करण्यास सक्रियपणे काम करण्यास पूर्णपणे कटिबद्ध व सज्ज असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते.

Web Title: Adani Transmission Limited Appointed as Partner for Advanced Meter Infrastructure by Mumbai BEST Enterprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.