अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेस आता एका नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे. अदानी एंटरप्रायझेसने वॉटर प्यूरिफाय, ट्रिटमेंट आणि डिस्ट्रिब्यूशन सेक्टरमध्ये पाऊल ठेवण्याची योजना आखली आहे. इंफ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या दृष्टीनेही हा अत्यंत महत्त्वाचा सेगमेंट असल्याचे कंपनीचे मत आहे.
याशिवाय, टाटा ग्रुपची पॅक्ड वॉटर कंपनी बिसलेरीला विकत घेत आहे. Bisleri चे मालक रमेश चौहान यांनी आपली कंपनी टाटा यांच्या हाती सोपवण्यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे वृत्ता नुकतेच आले होते. जर ही डील फायनल झाली, तर अदानी आणि टाटा ग्रुपमध्ये फाईट होऊ शकते.
20,000 कोटी रुपयांचा येतोय FPO -
कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. समूहाचे मुख्य वित्त अधिकारी जुगशिन्दर सिंह यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले, की कंपनीने 20,000 कोटी रुपयांच्या इश्यूची किंमत 3,112 रुपये ते 3,276 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.
सिंह म्हणाले, ''आम्ही पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील मुख्य कंपनी आहोत. तसेच, जवळपास दोन दशकांपासून या खंडातील जवळपास सर्वच क्षेत्रात आहोत. हे पाहता आम्ही, जलशुद्धीकरण, संशोधन आणि वितरण या क्षेत्रात पाऊल ठेवण्यास उत्सुक आहोत.'' मात्र, यासंदर्भात त्यांनी अधिक विस्तृतपणे माहिती दिलेली नाही.
27 जानेवारीला येणार एफपीओ -
अदानी समूहाचा हा एफपीओ 27 जानेवारीला खुला होईल आणि 31 जानेवारीला बंद होईल. मोठ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक दिवस आधी खुला होईल.