Join us  

अदानी घेणार आणखी एका क्षेत्राचा ताबा; टोटल एनर्जीज-अदानी समूहात ग्रीन हायड्रोजनसाठी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 6:10 AM

फ्रान्सची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोटल एनर्जीज अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमात २५ टक्के हिस्सा घेणार आहे.

नवी दिल्ली :

फ्रान्सची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोटल एनर्जीज अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमात २५ टक्के हिस्सा घेणार आहे. दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी स्वतंत्र निवेदनात ही माहिती दिली. या दोन्ही कंपन्या जगातील सर्वात मोठी ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम तयार करणार आहेत. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह कार्बनमुक्त इंधन तयार करण्यासाठी पुढील १० वर्षांत ५० अब्ज डॉलरपेक्षा (३.९ लाख कोटी रुपये) अधिक गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमची संयुक्तपणे उभारणी करण्यासाठी फ्रान्सच्या कंपनीसोबत नवीन भागीदारी केली आहे. निवेदनात मात्र कराराची रक्कम स्पष्ट केलेली नाही.ग्रीन हायड्रोजन कुठून मिळवला जातो? : पवनऊर्जा । सौरऊर्जा । बायोमास । इतर- १० लाख मेट्रिक टन उत्पादन लक्ष्य- एएनआयएल हे भारतातील ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन आणि व्यावसायीकरणासाठी एईएल आणि टोटल एनर्जीज मधील एकमेव व्यासपीठ असेल. - एएनआयएलने २०३० पर्यंत प्रतिवर्षी १० लाख मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन (एमटीपीए) उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे टोटल एनर्जीने सांगितले.

- १८५.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर जगभरात ग्रीन हायड्रोजन बाजाराचे मूल्य २०२० मध्ये  होते.

- ३७२.२ दशलक्ष डॉलरवर ग्रीन हायड्रोजन बाजाराचे मूल्य २०२७ पर्यंत वाढेल

- चीन इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त हायड्रोजन वापरतो व उत्पादन करतो (२४ दशलक्ष टनापेक्षा अधिक वापर) कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांना हायड्रोजन थेट पर्याय नसला तरी यामुळे तेलावरील अवलंबित्व काही प्रमाणात नक्की कमी होत आहे. भारतामध्ये २०२१ मध्ये हायड्रोजन पॉलिसीची घोषणा करण्यात आली आहे.

बदलाची अपेक्षा ग्रीन हायड्रोजनवर लक्ष केंद्रित केलेल्या या भागीदारीमुळे भारत आणि जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात बदलाची अपेक्षा असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे.

२५ % भागभांडवलया करारामध्ये, टोटल एनर्जीज, अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल)कडून  २५ टक्के भागभांडवल विकत घेईल,” असे निवेदनात म्हटले आहे.

हायड्रोजन कारकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नुकतेच संसदेत हायड्रोजन इंधनावर चालणारी कार घेऊन आले होते. 

अदानी-टोटल एनर्जी संबंधांचे धोरणात्मक महत्त्व व्यवसायाच्या पातळीवर आणि महत्त्वाकांक्षेच्या पातळीवर खूप मोठे आहे.    - गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी समूह

भविष्यातील १० लाख टन प्रति वर्ष ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता कंपनीला नवीन ऊर्जा उत्पादन वाढवण्यास मदत करेल.    - पैट्रिक पॅायने,  अध्यक्ष, टोटल एनर्जी

टॅग्स :अदानी