Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी

अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी

अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी असलेली अदानी विल्मर (Adani Wilmar) कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:44 PM2022-05-03T14:44:51+5:302022-05-03T14:45:36+5:30

अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी असलेली अदानी विल्मर (Adani Wilmar) कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

adani wilmar pips hindustan unilever to become largest indian fmcg company | अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी

अदानींनी खरेदी केलं 'कोहिनूर', HULला मागे टाकत अदानी विल्मर बनली देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी

अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी असलेली अदानी विल्मर (Adani Wilmar) कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अदानी विल्मर आता हिंदुस्थान युनिलिव्हरला मागे टाकून गेल्या आर्थिक वर्षात (FY22) विक्रमी महसुलाच्या आधारे भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात अदानी विल्मरचा वार्षिक महसूल ४६.२ टक्क्यांनी वाढला आहे.

अदानी समूहाच्या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात खाद्यतेलांचा फायदा झाला आहे. या कालावधीत कंपनीला ५४,२१४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ३७,०९० कोटी रुपये होता. दुसरीकडे, हिंदुस्तान युनिलिव्हरचा महसूल २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५१,४६८ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे अनेक दिवसांपासून पहिल्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरला अदानी विल्मारनं मागे टाकलं आहे.

खाद्यतेलाच्या व्यवसायाने नशीब पालटले
खाद्यतेलाच्या व्यवसायाचा सर्वाधिक फायदा अदानी विल्मरला झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात विल्मारच्या कमाईत या व्यवसायाचा वाटा सुमारे ८४ टक्के होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात विल्मरच्या खाद्यतेलाची विक्री ३०,८१८ कोटी रुपये होती, जी एका वर्षानंतर ४७.३ टक्क्यांनी वाढून ४५,४०१ कोटी रुपये झाली. कंपनीला इंडस्ट्री एसेंशियल व्यवसायातून सुमारे ११.४ टक्के महसूल मिळाला. या विभागातील विक्री मागील वर्षीच्या ४,३६६ कोटी रुपयांच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून ६,१९१.५ कोटी रुपये झाली आहे.

पॅकेज्ड फूडचा व्यवसाय अजूनही तोट्यात
अदानी विल्मरने अलीकडेच पॅकेज्ड फूड व्यवसायात प्रवेश केला आहे. या सेगमेंटने अद्याप नफा कमावला नाही, परंतु त्याचा महसूल ३८ टक्क्यांनी वाढला आहे. अदानी विल्मरच्या पॅकेज्ड फूड बिझनेसमध्ये गेल्या आर्थिक वर्षात २२.५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या व्यवसायाचा महसूल एका वर्षापूर्वीच्या १,९०५.६ कोटी रुपयांवरून वाढून २,६२१.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

'अदानी'च्या ताफ्यात 'कोहिनूर'सह 'हे' ब्रँड
दरम्यान, पॅकेज्ड फूडचा व्यवसाय वाढवण्यासाठी अदानी विल्मरने नवा करार केला आहे. या डीलमध्ये अदानी विल्मरने अमेरिकन कंपनी मॅककॉर्मिककडून पॅकेज्ड फूड ब्रँड 'कोहिनूर' कंपनी विकत घेतली आहे. मात्र, हा करार किती झाला हे अद्याप समोर आलेले नाही. या डीलमध्ये अदानीला केवळ अमेरिकन कंपनीचा प्रीमियम बासमती तांदूळचा ब्रँडच मिळाला नाही, तर चारमिनार आणि ट्रॉफीसारखे छत्री ब्रँडही त्याच्या वाट्याला आले आहेत. सध्या या ब्रँड्सची एकत्रित किंमत सुमारे ११५ कोटी रुपये आहे.

Web Title: adani wilmar pips hindustan unilever to become largest indian fmcg company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.