Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Wilmar Share Price : १५ हजारांवर १० हजारांचा नफा; अदानी समुहाच्या 'या' कंपनीनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

Adani Wilmar Share Price : १५ हजारांवर १० हजारांचा नफा; अदानी समुहाच्या 'या' कंपनीनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

अदानी समुहाच्या (Adani Group) एका कंपनीने गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:21 PM2022-02-10T19:21:10+5:302022-02-10T19:21:27+5:30

अदानी समुहाच्या (Adani Group) एका कंपनीने गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

Adani Wilmar Share Price breaks into Rs 50000 cr m cap club stock up 70 percent in 3 days investors got more profit | Adani Wilmar Share Price : १५ हजारांवर १० हजारांचा नफा; अदानी समुहाच्या 'या' कंपनीनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

Adani Wilmar Share Price : १५ हजारांवर १० हजारांचा नफा; अदानी समुहाच्या 'या' कंपनीनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

अदानी समुहाच्या (Adani Group) एका कंपनीने गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचं नाव अदानी विल्मर (Adani Wilmar) असं आहे. कंपनीच्या शेअर्सने 3 दिवसांत गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर अदानी विल्मरचा शेअर 19.99 टक्क्यांनी वाढून 381.80 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये कंपनीचा शेअर 19.99 टक्क्यांनी वाढून 386.25 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्सला सध्या BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी अपर सर्किट लागले होते.

अदानी विल्मरचे शेअर्स 8 फेब्रुवारी 2021 रोजी शेअर बाजारावर 221 रुपयांना लिस्ट झाले. 10 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई वर अपर सर्किटसह 381.80 रुपयांवर आहेत. जर एखाद्या व्यक्तीने BSE वर लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचे शेअर्स 221 रुपयांना विकत घेतले असतील तर त्याला एका शेअरवर 160 रुपये नफा झाला असता. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स NSE वर 227 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते आणि आज ते 386.25 रुपयांच्या पातळीवर आहेत. त्यानुसार प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदाराला 159.25 रुपये नफा झाला असता.

लिस्टिंग सुस्त
अदानी विल्मरची शेअर बाजारात लिस्टिंग थोडी सुस्त झाली होती. अदानी विल्मरचे शेअर्स बीएसईवर 4 टक्क्यांच्या सूट सह 221 रुपयांवर लिस्ट झाले होती. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स एनएससीवर 1 टक्के सवलतीसह 227 रुपयांना लिस्ट झाले. अदानी विल्मरच्या आयपीओचा प्राईज बँड 218-230 रुपये होता. अदानी विल्मर हा उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह आणि सिंगापूरस्थित विल्मर समूह यांचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत स्वयंपाकाचे तेल आणि इतर काही उत्पादने विकते.

410 रुपये असू शकते टार्गेट प्राईज
सध्याच्या लेव्हलवर प्रॉफिट बुक केलं पाहिजे, असे स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांचे मत आहे. हाय रिस्क ट्रेडर्स 319 रुपयांच्या जवळ स्टॉप लॉस राखून छेवण्यासाठी शेअर्स होल्ड करू शकतात. अदानी समुहाचा हा शेअर 410 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे. "सध्या हा शेअर 350 रुपयांचा स्तर पार करून त्याच्यावर ट्रेड करत आहे. ज्यांनी हा शेअर होल्ड केला आहे आणि जे जोखीम उचलण्याची क्षमता ठेवतात ते 328 रुपयांच्या ट्रेलिंग स्टॉप लॉस सोबत होल्ड करू शकतात. या शेअरचे संभाव्य टार्गेत 400 ते 410 रुपये आहे," अशी प्रतिक्रिया IIFL सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी दिली.

Web Title: Adani Wilmar Share Price breaks into Rs 50000 cr m cap club stock up 70 percent in 3 days investors got more profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.