बीजिंग : चीनमधील सर्वात मोठ्या खासगी कंपनीपैकी एक असलेल्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या अदानी समूहाने ३० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. गुजरातमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (एसईझेड) हे प्रकल्प उभे राहणार आहेत.
शांघाई येथील भारतीय वाणिज्यदूतांनी सांगितले की, अदानी आणि ईस्ट होप यांच्यातील करारानुसार, गुजरातच्या मुंद्राक विशेष आर्थिक क्षेत्रात सौरऊर्जा उत्पादन उपकरण, रसायन, अॅल्युमिनियम आणि पशुखाद्यनिर्मिती संच उभारण्यात येणार आहेत. उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी ईस्ट होप समूहाचा इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रियल विभाग कार्यरत असणार आहे.
या करारावर अदानी पोर्ट अँड सेझचे अध्यक्ष अमित उपलेंचर आणि ईस्ट होपचे अध्यक्ष (गुंतवणूक) मेंग चांगजून यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी भारताचे वाणिज्यदूत प्रकाश गुप्ता हेही उपस्थित होते. या करारानुसार, ईस्ट होप समूह भारतात ३० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. १८० दिवसांच्या आत या करारात बदल करता येणार आहे.
चिनी कंपनीशी अदानीचा ३० कोटी डॉलर्सचा करार
चीनमधील सर्वात मोठ्या खासगी कंपनीपैकी एक असलेल्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या अदानी समूहाने ३० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 01:39 AM2017-06-22T01:39:11+5:302017-06-22T01:39:11+5:30