Join us  

Gautam Adani: गौतम अदानींचं साम्राज्य आलं निम्म्यावर, नेटवर्थमध्येही ५३ टक्क्यांची घट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 8:14 AM

हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाची पडझड सुरू झाली असून कंपनीच्या शेअर्समधील पडझड काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

नवी दिल्ली-

हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाची पडझड सुरू झाली असून कंपनीच्या शेअर्समधील पडझड काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. या घसरणीत अदानी ग्रूपचा मार्केट कॅप ९ दिवसात ९.५ लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला गौतम अदानींची नेटवर्थ देखील तब्बल ५३ टक्क्यांनी कमी झाली आहे. फॉरेक्स ट्रेडर्सच्या दाव्यानुसार, हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सबाबत बाजारातील एकंदर भावना आणि विश्वास खूप जास्त बिघडला आहे, त्यामुळे या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशीचा व्यवहार बंद होत असताना अदानी समूह समूहाच्या दहापैकी सहा कंपन्यांचे शेअर्स तोट्यात राहिले. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स १० टक्क्यांनी घसरले, तर अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मार प्रत्येकी ५ टक्क्यांनी घसरले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ०.७४ टक्क्यांच्या किंचित घसरणीसह बंद झाले. सुरुवातीच्या व्यापारात त्याचा हिस्सा ९.५० टक्क्यांनी खाली आला होता, परंतु नंतर त्याची स्थिती सुधारली. घसरणीचा कल असतानाही समूहातील चार कंपन्यांनी नफा नोंदवला. यापैकी अदानी पोर्ट अँड एसईझेड लिमिटेड ९.४६ टक्क्यांनी वधारण्यात यशस्वी ठरला. अंबुजा सिमेंटमध्ये १.५४ टक्के, एसीसी २.२४ टक्के आणि एनडीटीव्ही १.३७ टक्क्यांनी सुधारणा झाली.

निम्मा मार्केट कॅप राखस्टॉक्सबॉक्सचे संशोधन प्रमुख मनीष चौधरी म्हणाले की, गेल्या ९ ट्रेडिंग दिवसांमध्ये समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ९.५ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे, जो सुमारे ४९ टक्के आहे. हिंडेनबर्ग अहवाल आणि एफपीओ मागे घेतल्याने व्यावसायिक भावनेवर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे समूहाचे एकूण मार्केट कॅप १० लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये आणखी घसरण होऊ शकते. २४ जानेवारी रोजी समूहाची मार्केट कॅप १९ लाख कोटी रुपयांहून अधिक होती.

अदानींची संपत्ती पोहोचली अर्ध्यावरदुसरीकडे, गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीतही निम्म्याहून अधिक घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २४ जानेवारी रोजी अदानीची एकूण संपत्ती १९९ अब्ज डॉलर होती, जी सध्या ५६.४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. याचा अर्थ या काळात गौतम अदानी यांच्या संपत्तीत ६२.६ अब्ज डॉलर म्हणजेच ५३ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ५३ टक्क्यांहून अधिक म्हणजे ६४.२ अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे.

हिंडनबर्गचे खळबळजनक आरोपअमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर फसवे व्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. अदानी समूहाने हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. सर्व कायदे आणि नियमांचं पालन करत असल्याचा दावा कंपनीनं केला. त्याचवेळी सोमवारी त्यांनी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाची आगाऊ परतफेड करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवता येईल.

टॅग्स :गौतम अदानीअदानी