उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) आता देशातील सीमेंट किंग ठरणार आहे. त्यांच्या अदानी समुहानं देशातील दोन मोठ्या सीमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड (Acc Limited) आणि अंबुजा सीमेंट (Ambuja Cement) या कंपन्या खरेदी केल्या आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी कुटुंबानं (Adani Family) एक विशेष ऑफशोर कंपनी (SPV) तयार करून एसीसी आणि अंबुजा सीमेंटमध्ये स्वित्झर्लंडची सीमेंट कंपनी Holcim Ltd मध्ये हिस्सा खरेदी केला आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये एक करार (Definitive Agreement) करण्यात आला आहे. यासोबतच आता अदानी समुहानं सीमेंट व्यवसायात एन्ट्री करणार आहे.
Holcim आणि त्यांच्या सब्सिडायरी कंपन्यांकडे अंबुजा सीमेंटमध्ये ६३.१९ टक्के आणि एसीसीमध्ये ५४.५३ टक्के हिस्सा आहे. एसीसी सीमेंटमध्ये आपला ५४.५३ टक्के हिस्स्यापैकी ५०.०५ टक्के हिस्सा त्यांनी अंबुजा सीमेंटच्या माध्यमातून खरेदी केला. अदानी समुहानं दोन्ही कंपन्यांमध्ये होलसिमच्या हिस्स्यासाठी १०.५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. देशाच्या इतिहासात एन्फ्रास्ट्रक्चर आणि मटेरिअल सेक्टरमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील आहे.
अदानी बनले सीमेंट किंग
Holcim Ltd च्या कंपन्या गेल्या १७ वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे. भारतात त्यांच्याकडे तीन प्रमुख ब्रँड आहेत. यामध्ये अंबुजा सीमेंट, एसीसी सीमेंट आणि मायसेम यांचा समावेश आहे. अल्ट्राटेक सीमेंटनंतर आता भारतीय बाजारात Holcim Ltd ही दुसरी मोठी कंपनी आहे. अंबुजा सीमेंट आणि एसीसी लिमिटेड यांची संयुक्त क्षमता वार्षिक ६६ मिलियन टन इतकी आहे.