Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

Adar Poonawalla : पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी 81 टॉवरचा संपूर्ण विंग आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:20 PM2021-09-02T16:20:03+5:302021-09-02T16:21:16+5:30

Adar Poonawalla : पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी 81 टॉवरचा संपूर्ण विंग आहे

Adar Poonawalla : Adar Poonawalla’s finance company buys 13-floors in Pune office tower for Rs 464 crore | Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

Highlightsपुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी 81 टॉवरचा संपूर्ण विंग आहे

पुणे - लस निर्मित्ती क्षेत्रातील नामवंत उद्योजक आणि कोविशिल्ड लसीचे प्रणेते सीरम इंस्टीट्यूचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी पुण्यात ऑफिससाठी मोठी जागा खेरदी केली आहे. सायरस पुनावाला यांच्या पुनावाला फायनान्स या कंपनीने पुण्यातील एका कमर्शिलय टॉवरमध्ये 13 फ्लोअर विकत घेतले आहेत. पुण्यातील मुंढवा परिसरात हे टॉवर असून या खरेदी केलेल्या एकूण फ्लोअरची किंमत बाजार मुल्यांकनानुसार 464 कोटी रुपये असल्याचे समजते. 

पुण्यात कंपनीच्या ऑफिससाठी विकत घेण्यात आलेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी प्रॉपर्टी असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. नव्या प्रॉपर्टीसह पुनावाला फायनान्सकडे एपी 81 टॉवरचा संपूर्ण विंग आहे. कारण, कंपनीने यापूर्वीच टॉवरमधील या विंगचा पहिला आणि दुसरा असे दोन फ्लोअर विकत घेतले आहेत. कोरोना महामारीच्या काळात देशातील पहिली लस बनविल्याने पुनावाला आणि सीरम इंस्टीट्यूट हे नाव जभभरात पोहोचले आहे. भारतातही गावखेड्यापर्यंत कोविश्ल्ड पोहोचल्याने पुनावाल यांची ओळख निर्माण झाली आहे. 

लसींकरणावरुन सरकारवर साधला होता निशाणा

‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, अशा थापा नेते मारत आहेत. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे हे सोपे नाही. ते १५ कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. दर वर्षी ११०-१२० कोटी डोस देण्याचे आश्वासन आम्ही दिले. इतर कंपन्यांच्या लसींचे उत्पादनही सुरू आहे. या सगळ्यांची आकडेमोड करून किती डोस उपलब्ध होऊ शकतात, हे मोजता येऊ शकेल, अशा शब्दांत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. सायरस पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 
 

Web Title: Adar Poonawalla : Adar Poonawalla’s finance company buys 13-floors in Pune office tower for Rs 464 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.