लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पॅन क्रमांक आधारशी जोडण्यासाठी आता एसएमएस आधारित सुविधा आयकर विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक एसएमएस करून, पॅन क्रमांक आधारशी जोडता येईल.
पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी कसा जोडायचा हे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ५६७६७८ अथवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून पॅन आणि आधारची जोडणी केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट देऊनही दोन्ही क्रमांक जोडता येऊ शकतात. दोन्ही कार्डावरील नावे समान असल्यास जोडणी सहजपणे होईल. तथापि, नावात अल्प प्रमाणात तफावत असल्यासही जोडणी करता येईल. नवे पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठी अर्जामध्येच आधार क्रमांक नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पॅन क्रमांक आहे; पण कार्ड नाही, त्यांना नवे कार्ड घेण्यासाठी भरावयाच्या अर्जातही ही सोय करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
यापुढे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन क्रमांक आधारशी जोडलेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅन आणि आधारची जोडणी करण्यासाठी विभागाने नवी ई-सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइच्या
होमपेजवर एक लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून दोन्ही क्रमांक जोडण्याच्या सुविधेवर पोहोचता येते. योग्य माहिती भरल्यानंतर यूआयडीएआयकडून पडताळणी होते. त्यानंतर दोन्ही क्रमांकाची जोडणी प्रक्रिया पूर्ण होते. पॅन आणि आधारमधील माहितीत तफावत असल्यास आधार यंत्रणेकडून वन टाइम पासवर्ड दिला जातो. आधार डाटाबेसमध्ये नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर हा पासवर्ड पाठविला जातो. त्यानंतर जोडणी प्रक्रिया पूर्ण होते.
पॅन आणि आधार आता एसएमएसने जोडा
पॅन क्रमांक आधारशी जोडण्यासाठी आता एसएमएस आधारित सुविधा आयकर विभागाकडून उपलब्ध करून
By admin | Published: June 1, 2017 12:49 AM2017-06-01T00:49:28+5:302017-06-01T00:49:28+5:30