ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - भारतात 4जीची सेवा सुरू केल्यापासून मोबाईल सेवा देणा-या अनेक कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली पाहायला मिळते आहे. एअरटेल 4जीची सेवा अधिकाअधिक पोहोचावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातही करते आहे. त्यातच रिलायन्स जिओनंही ग्राहकांना आकर्षिक केलं आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलनं प्रत्येक पोस्ट पेड ब्रॉडबँड या डीटीएच ग्राहकाला 5 जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे. भारतीय एअरटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत कुमार गुरस्वामी यांनी सांगितले की, एअरटेलकडून आमच्या ग्राहकांसाठी ही छोटी भेट आहे.
एअरटेलमध्ये लँडलाइन फ्री कॉल सेवेसोबत आता तुम्ही एअरटेल ब्रॉडबँड ग्राहक असल्यास मोफत अतिरिक्त डेटाचाही उपयोग करू शकता. एअरटेलनं डिजिटल टीव्ही कनेक्शनसाठी 5 जीबी अतिरिक्त डेटा दिला आहे. जितके अधिक कनेक्शन असतील. तितकाच जास्त मोफत डेटा तुम्हाला मिळेल, अशी माहिती हेमंत कुमार यांनी दिली आहे. एअरटेल ब्रॉडबँडवाल्या घरात जर दोन एअरटेलचे पोस्टपेड कनेक्शन आणि डिजिटल टीव्ही कनेक्शन असल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15 जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळणार आहे.