Lokmat Money > बिझनेस न्यूज > युजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

युजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

व्हाॅटसॲपचे देशात जवळपास ५० कोटी यूजर्स आहेत. कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये विविध अकाऊंटबाबत १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:59 AM2024-02-05T05:59:22+5:302024-02-05T05:59:39+5:30

व्हाॅटसॲपचे देशात जवळपास ५० कोटी यूजर्स आहेत. कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये विविध अकाऊंटबाबत १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Addressing user complaints; WhatsApp closed your account? | युजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

युजर्संच्या तक्रारींची दखल; व्हाॅटसॲपने तुमचे अकाउंट बंद केले?

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : युजर्सकडून आलेल्या विविध तक्रारींची दखल घेत व्हाॅटसॲपने डिसेंबरमध्ये भारतात ६९.३४ लाख अकाऊंट बंद केली आहेत. १ ते ३१ डिसेंबर या काळात ही कारवाई केल्याची माहिती कंपनीने दर महिन्याला जारी करण्यात येत असलेल्या अहवालात  दिली आहे. 

व्हाॅटसॲपचे देशात जवळपास ५० कोटी यूजर्स आहेत. कंपनीला डिसेंबर २०२३ मध्ये विविध अकाऊंटबाबत १६,३६६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानुसार आयटी अधिनियमाचा भंगाचा ठपका काही अकाऊंटवर ठेवण्यात आला तर काही बाबतीत कंपनीने स्वत: दखल घेत ही कारवाई केली आहे. 
नोव्हेंबरमध्ये कंपनीने देशातील ७१ अकाऊंटवर बंदीची कारवाई केली होती. कंपनीच्या सेवेचा दुरुपयोग होऊ नये इंजिनीअर्स, डेटा सायंटिस्ट, रिसर्चर्स आणि ऑनलाइन सेफ्टी तज्ज्ञांची टीम नियुक्त केली आहे.

Web Title: Addressing user complaints; WhatsApp closed your account?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.