Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adhaar Update: कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Adhaar Update: कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Appointment: आता तुम्ही घरी बसून आधारसंबंधी माहिती अपडेट करू शकता, यासाठी फक्त 'हे' काम करावं लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:06 PM2022-02-24T18:06:12+5:302022-02-24T18:06:21+5:30

Aadhaar Appointment: आता तुम्ही घरी बसून आधारसंबंधी माहिती अपडेट करू शकता, यासाठी फक्त 'हे' काम करावं लागेल.

Adhaar Card Update | New facility for Aadhaar update, UIDAI said | Adhaar Update: कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Adhaar Update: कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती

नवी दिल्ली:आधार कार्ड(Aadhaar Card) हे भारतातील एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही, तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी लाभांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. या आधार कार्डमध्ये सर्व महत्वाची माहिती साठवलेली असते. मुलांच्या प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो.

अपडेट करा आधार कार्ड    
अनेक वेळा असे घडते की, तुम्हाला आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख बदलावी लागते किंवा नवीन आधार कार्ड बनवावे लागेल. हे आधार अपडेट करण्यासाठी अनेकदा आधार केंद्रावर जावे लागते, पण आता या सर्व त्रासापासून सुटका मिळणार आहे. आता तुम्ही घरी बसून आधारसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि आधार सेवा केंद्रावरील लांबलचक रांगेपासून सुटका मिळवू शकता. 

अप्वाइंटमेंटद्वारे हे काम केले जाईल
- नवीन आधार नोंदणी
- नाव अपडेट
- पत्ता अपडेट
- मोबाईल नंबर अपडेट
- ईमेल आयडी अपडेट
- जन्मतारीख अपडेट
- लिंग अपडेट
- बायोमेट्रिक अपडेट्स

शेड्यूल करा ऑनलाइन अप्वाइंटमेंट
- https://uidai.gov.in/ वर जा.
- My Aadhaar वर क्लिक करा आणि अपॉइंटमेंट बुक निवडा.
- आधार सेवा केंद्रांवर बुक अपॉइंटमेंट निवडा.
- ड्रॉपडाउनमध्ये तुमचे शहर आणि स्थान निवडा.
- अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी Proceed वर क्लिक करा.
- मोबाईल नंबर एंटर करा, 'नवीन आधार' किंवा 'आधार अपडेट' टॅबवर क्लिक करा.
- कॅप्चा एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.
- OTP एंटर करा आणि Verify वर क्लिक करा.
- पुराव्यासह वैयक्तिक तपशील आणि पत्ता तपशील प्रविष्ट करा.
- टाइम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.
- आता तुमची अप्वाइंटमेंट शेड्यूल होईल.
 

Web Title: Adhaar Card Update | New facility for Aadhaar update, UIDAI said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.