Join us  

उद्योगविश्वातील मोठी घडामोड! Godrej Industries च्या अध्यक्षपदावरून आदी गोदरेज पायउतार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 4:20 PM

Adi Godrej to step down From Godrej: नादिर हे सध्या कंपनीचे एमडी आहेत. आदि यांच्या राजीनाम्यानंतर नादिर यांच्याकडे एमडी पदासह अध्यक्ष पदाचीही जबाबदारी येणार आहे.

उद्योगविश्वातील एक मोठे नाव असलेल्या गोदरेज इंडस्ट्रीजच्या (Godrej Industries) अध्यक्षपदाचा आदी गोदरेज यांना राजीनामा दिला आहे. आता त्यांची जागा भाऊ नादिर गोदरेज घेणार आहेत. इथून पुढे नादिरच गोजरेज कंपनीचे सर्वेसर्वा बनणार आहेत. (Adi Godrej to step down from Godrej India board. Nadir Godrej to take over as Chairman.)

आदि गोदरेज हे मानद अध्यक्ष राहणार आहेत. Godrej Industries Limited च्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत आदि गोदरेज यांचा राजीनामा स्वीकारला. यामुळे आदि गोदरेज आता कंपनीच्या संचालक मंडळावरही राहणार नाहीत. राजीनामा दिलेला असला तरीही लगेचच ते हे पद सोडणार नाहीत. 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. 1 ऑक्टोबरला ते कंपनीची सारी सुत्रे नादिर गोदरेज यांच्याकडे सोपवतील. 

नादिर हे सध्या कंपनीचे एमडी आहेत. आदि यांच्या राजीनाम्यानंतर नादिर यांच्याकडे एमडी पदासह अध्यक्ष पदाचीही जबाबदारी येणार आहे. आदि गोदरेज यांनी सांगितले की, Godrej Industries ची सेवा करण्याचे भाग्य मला 4 दशके लाभले. या काळात कंपनीने चांगली झेप घेतली आहे. संचालक मंडळानेही मला वेळोवेळी सहकार्य केले. मी कंपनीशी संबंधीत प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो. 

टॅग्स :व्यवसाय