Lokmat Money > बिझनेस न्यूज > आदिदास करणार मर्यादित व्यवसाय, भारतात कर्मचारी कपात करणार ?

आदिदास करणार मर्यादित व्यवसाय, भारतात कर्मचारी कपात करणार ?

क्रीडा साहित्याच्या उत्पादनात अग्रणी समजली जाणारी जर्मनीची कंपनी आदिदास भारतातील आपला व्यवसाय मर्यादित करण्याच्या प्रयत्नात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:30 AM2017-09-08T01:30:04+5:302017-09-08T01:30:58+5:30

क्रीडा साहित्याच्या उत्पादनात अग्रणी समजली जाणारी जर्मनीची कंपनी आदिदास भारतातील आपला व्यवसाय मर्यादित करण्याच्या प्रयत्नात आहे.

 Adidas limited business | आदिदास करणार मर्यादित व्यवसाय, भारतात कर्मचारी कपात करणार ?

आदिदास करणार मर्यादित व्यवसाय, भारतात कर्मचारी कपात करणार ?

नवी दिल्ली : क्रीडा साहित्याच्या उत्पादनात अग्रणी समजली जाणारी जर्मनीची कंपनी आदिदास भारतातील आपला व्यवसाय मर्यादित करण्याच्या प्रयत्नात आहे. याअंतर्गत कंपनी भारतातील आपले कर्मचारी आणि फ्रॅन्चाईज कमी करू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटांची कंपनी रिबॉकची मूळ कंपनी आदिदास पुढील काही महिन्यात भारतातील आपल्या एक चतुर्थांश कर्मचाºयांची कपात करण्याच्या विचारात आहे. याशिवाय रिलायन्ससोबतही आपल्या काही फ्रॅन्चाईज विकण्याबाबत कंपनीची चर्चा सुरू आहे.
कर्मचा-यांना नोकरीतून कमी करण्याबाबत आदिदासच्या प्रवक्त्यास विचारणा केली असता ते म्हणाले की, आमचे भारतातील
लक्ष्य आणि गुंतवणूक कायम राहणार असून नोकरकपातीबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. हे वृत्त पूर्णत: कपोलकल्पित आहे. आम्ही इंडस्ट्रीत व्यापार सहभागाच्या संधी शोधत राहू.
डीआयपीपीकडून दुकाने उघडण्याची परवानगी आदिदासला डीआयपीपीकडून दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. कंपनी आता भारतात आपली मोठी दुकाने उघडू शकणार असून, या ठिकाणी किमती आणि सर्व प्रकारचे चप्पल व जोडे उपलब्ध असतील. यासाठी आदिदासला फ्रॅन्चाईजेसची गरज पडेल. परंतु कंपनीने आपले सहकारी ५०० वरून ७० पर्यंत कमी केले आहेत.

Web Title:  Adidas limited business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.