Join us  

बिर्ला ग्रुपने पॉश भागात खरेदी केला आणखी एक बंगला; किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:16 PM

याआधीही बिर्ला ग्रुपने मलबार हिलमध्ये 1000 कोटी आणि 425 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपने मुंबईच्या पॉश भागात आणखी एक बंगला विकत घेतला आहे, जो अब्जाधीशांचा मोहल्ला म्हणूनही ओळखला जातो. या बंगल्याची किंमत 220 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिर्ला ग्रुपने जो बंगला विकत घेतला आहे, तो अर्धा एकर जमिनीवर पसरलेला आहे. याआधीही बिर्ला ग्रुपने मलबार हिलमध्ये 1000 कोटी आणि 425 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचा हा बंगला ग्राउंड प्लस टू प्रॉपर्टी कारमाईल रोड एमएल डहाणूकरवर आहे. या बंगल्याचे रजिस्ट्रेशन गेल्या 10 एप्रिल रोजी झाले आहे. याआधी बिर्ला ग्रुपने आलिशान बंगला खरेदी केला आहे.

मलबार हिलमध्येही खरेदी केला आहे बंगला 2021 मध्ये एका प्रॉपर्टी डीलमध्ये राधाकिशन दमाणी आणि त्यांचा भाऊ गोपीकिशन दमानी यांनी मुंबईतील अब्जाधीशांच्या परिसर मलबार हिल्समध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला होता. त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दमाणींनी खरेदी केलेल्या या बंगल्याची किंमत 1001 कोटी रुपये आहे. माहितीनुसार, त्याची नोंदणी 2021 मध्ये 31 मार्च रोजी झाली होती.

जटिया हाऊस हे देखील लक्झरी प्रॉपर्टीपैकी एक2015 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी लिटिल गिब्स रोडवरील मलबार हिल्समध्ये जटिया हाऊस विकत घेतले. त्यावेळी त्याची किंमत 425 कोटी रुपये होती. हा बंगला 2 मजली आहे आणि त्यात पार्किंगची खुली जागा आहे. संपूर्ण बंगला अंदाजे 25,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला आहे. हा बंगला होमी भाभा यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.

13 कोटी मुद्रांक शुल्क आकारलेबिर्ला ग्रुपने खरेदी केलेल्या बंगल्याचे नोंदणीसाठी 13.02 कोटींचे मुद्रांक शुल्क आकारले आहे. या मालमत्तेची मालकी एर्नी खरशेदजी दुबाश यांच्याकडे होती, ज्यांच्याकडून बिर्ला ग्रुपने ती विकत घेतली आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसाय