मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही मोठी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांतर्गत येणाऱ्या अनेक योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे कंपन्यांना मोठा फायदा होत असून, कंपन्याही गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत असल्याचे समोर आले आहे. आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्झी कॅप फंडाने एक वर्षात गुंतवणूकदारांना ६३.५१ टक्के परतावा दिला आहे. (aditya birla sun life flexi cap fund gives best return across the category)
म्युच्युअल फंडांमधील फ्लेक्झी कॅप फंड योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. या श्रेणीतील काही योजनांनी मागील वर्षभरात सरासरी ६३ टक्के परतावा दिला आहे. ३० जून २०२१ अखेर आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्झी कॅप फंडाने एका वर्षात गुंतवणूकदारांना ६३.५१ टक्के परतावा दिला आहे. त्यानंतर कोटक फ्लेक्झी कॅपने ५०.१९ टक्के परतावा दिला आहे. तर, ऍक्सिस फ्लेक्झी फंडाने ४८.५१ टक्के रिटर्न दिला आहे.
आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
पाच वर्षात फ्लेक्झी कॅपने १५.६७ टक्के दिला परतावा
या फंडाची तीन वर्षाची कामगिरी पहिली तर बिर्ला सन लाईफने १४.५७ टक्के, एचडीएफसी फ्लेक्झी कॅपने १४.४३ टक्के आणि कोटक फ्लेक्झी कॅपने १३.९४ टक्के रिटर्न दिला आहे. पाच वर्षात बिर्ला सनलाईफ फ्लेक्झी कॅपने १५.६७ टक्के, कोटक फ्लेक्झी कॅपने १४.७५ टक्के आणि एचडीएफसी फ्लेक्झी कॅपने १४.०१ टक्के परतावा दिला आहे.
पाकिस्तानात ‘या’ भारतीय चॅनलला सर्वाधिक डिमांड; आकाशवाणीही लोकप्रिय!
दरम्यान, एखाद्या गुंतवणूकदाराने २२ वर्षांपूर्वी बिर्ला सनलाईफ फ्लेक्झी कॅपमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असल्यास आजच्या घडीला हे मूल्य १.०४ कोटी इतके वाढलेले असेल. यात १०४ पटीने परतावा मिळेल. एक वर्षांपूर्वी १० हजारांची गुंतवणूक केली असल्यास त्याचे आता १६३५१ रुपये आणि ५ वर्षात २०७१८ रुपये होतील, असे सांगितले जात आहे.