सलापूर: जिल्ात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे ताण पडून टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे़ यावर मात करण्यासाठी टँकर देणे हा शेवटचा पर्याय आहे़ टँकर देणार नाही अशी प्रशासनाची भूमिका नाही, परंतु या अगोदर विविध उपाययोजना केल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मंुढे यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठकीत मुंढे बोलत होते़ यावेळी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी उपस्थित होते़ भूजल सर्वेक्षण विभागाने १५ मे ची निश्चित केलेली पाणीपातळी लक्षात घेऊन तालुकास्तरावर नियोजन करावे, टंचाईबाबतच्या शासनाच्या सूचनेनुसार १ ते ९ उपाययोजना कराव्यात़ यामध्ये टँकर देणे हा शेवटचा पर्याय आहे़ प्रतिबंधात्मक आराखड्यानुसार अंमलबजावणी करावी़ नादुरुस्त योजना त्वरित दुरुस्त कराव्यात, अशा विविध उपाययोजनांद्वारे बरेच प्रश्न सुटतात़ आगामी काळात पाऊस लवकर न झाल्यास विषय चिघळणार नाही, याबाबत सतर्क राहून दक्षता घ्यावी़ आवश्यकतेनुसार योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी मुंढे यांनी दिल्या़
टँकर न देण्याची प्रशासनाची भूमिका नाही- जिल्हाधिकारी
सोलापूर: जिल्ात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे ताण पडून टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे़ यावर मात करण्यासाठी टँकर देणे हा शेवटचा पर्याय आहे़ टँकर देणार नाही अशी प्रशासनाची भूमिका नाही, परंतु या अगोदर विविध उपाययोजना केल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मंुढे यांनी केले़
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:33+5:302015-07-10T23:13:33+5:30