Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर अथवा प्लॉट खरेदीसाठी PF मधून काढता येतात अ‍ॅडव्हान्स पैसे, निवडावा लागेल हा फॉर्म; जाणून घ्या प्रोसेस

घर अथवा प्लॉट खरेदीसाठी PF मधून काढता येतात अ‍ॅडव्हान्स पैसे, निवडावा लागेल हा फॉर्म; जाणून घ्या प्रोसेस

EPFO सदस्य मालमत्ता खरेदीसाठी पीएफ फंडातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:37 AM2023-04-23T00:37:51+5:302023-04-23T00:42:31+5:30

EPFO सदस्य मालमत्ता खरेदीसाठी पीएफ फंडातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकतात...

Advance money can be withdrawn from PF for purchase of house or plot, know about the rule and process | घर अथवा प्लॉट खरेदीसाठी PF मधून काढता येतात अ‍ॅडव्हान्स पैसे, निवडावा लागेल हा फॉर्म; जाणून घ्या प्रोसेस

घर अथवा प्लॉट खरेदीसाठी PF मधून काढता येतात अ‍ॅडव्हान्स पैसे, निवडावा लागेल हा फॉर्म; जाणून घ्या प्रोसेस

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हा बचतीचा एक महत्वाचा स्रोत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या  पगाराचा काही भाग हा पीएफ फंडात दरमहिन्याला जमा होत असतो. जमा केलेल्या रकमेवर सरकार वार्षिक व्याजही देते. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. यापूर्वी तो 8.1 टक्का एवढा होता. पीएफ खातेदार गरज भासल्यास त्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे सहज काढू शकतात. महत्वाचे म्हणजे, EPFO सदस्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी पीएफ फंडातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकतात.

घर अथवा प्लॉट खरेदीसाठी अ‍ॅडव्हॉन्स -
EPFO ने प्लॉट खरेदी, घर बांधणी अथवा घर खरेदीसाठी  आपल्या PF खात्यातून आगाऊ पैसे काढण्यासंदर्भात तरतूद केली आहे. ज्या ईपीएफ सदस्याने आपल्या सदस्यत्वाची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. ज्याच्या खात्यात व्याजासह किमान एक हजार रुपये जमा आहेत. अशी व्यक्ती अ‍ॅडव्हान्स अंतर्गत खात्यातून पैसे काढू शकते. महत्वाचे म्हणजे, प्लॉट खरेदीसाठी DA सह 24 महिन्यांचा पगार अथवा व्याजासह EPF खात्यात जमा असलेली एकूण रक्कम आणि प्लॉटची प्रत्यक्ष किंमत. यांपैकी जी रक्कम कमी असेल ती आपण मिळवू शकता.

असा करा अर्ज -
ही अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्यासाठी आपल्याला Umang  अ‍ॅपवर अथवा ईपीएफओच्या वेबसाइटवर फॉर्म 31 भरावा लागेल. आपल्याला सर्वप्रथम उमंग अ‍ॅपवर आपला UAN टाकावा लागेल. यानंतर Get OTP वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल. यानंतर फॉर्म 31 निवडून आपल्याला अ‍ॅडव्हान्स कशासाठी हवी आहे ते टाका. यानंतर किती पैसे काढायचे आहे ते टाका. यानंतर आपल्याला आपल्या बँक खात्याच्या चेकचा फोटो अपलोड करावा लागेल. अशा प्रकारे आपण पैसे काढण्यासाठी दावा करू शकाल. यानंतर पैसे आपल्या खात्यात जमा होतील. 

Web Title: Advance money can be withdrawn from PF for purchase of house or plot, know about the rule and process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.