Lokmat Money > बिझनेस न्यूज > कठीण व्हिसा नियमांचा फायदाच

कठीण व्हिसा नियमांचा फायदाच

ट्रम्प प्रशासनाच्या हालचालींमुळे भारतातील प्रवेश स्तरावरील कॉम्प्युटर प्रोग्रामरसाठी ही अडचण सांगितली जात आहे.

By admin | Published: April 6, 2017 12:20 AM2017-04-06T00:20:02+5:302017-04-06T00:20:02+5:30

ट्रम्प प्रशासनाच्या हालचालींमुळे भारतातील प्रवेश स्तरावरील कॉम्प्युटर प्रोग्रामरसाठी ही अडचण सांगितली जात आहे.

The advantage of tough visa rules | कठीण व्हिसा नियमांचा फायदाच

कठीण व्हिसा नियमांचा फायदाच

नवी दिल्ली : व्हिसा नियम कडक करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या हालचालींमुळे भारतातील प्रवेश स्तरावरील कॉम्प्युटर प्रोग्रामरसाठी ही अडचण सांगितली जात आहे. पण, या माध्यमातून भारतातील प्रतिभावान व्यावसायिकांना अमेरिकेतील प्रवेशाचे दार खुले होणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
एच १ बी व्हिसासाठी ज्यांचा विचार केला जातो त्यात प्रवेश स्तरावरील प्रोग्रामरची संख्या कमी होत आहे. २०१४ व २०१५ची अमेरिकेतील आकडेवारी हे दर्शविते की, ज्या प्रोग्रामर्सला एच १ बी व्हिसासाठी पात्र ठरविण्यात आले, त्यांची टक्केवारी एकूण पात्र व्हिसा सदस्यांमध्ये फक्त १२ टक्के आहे. न्यूज एजन्सी ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या पात्र ठरलेल्या या कॉम्युटर प्रोग्रामरपैकी ४१ टक्के कर्मचारी हे कमी वेतनासाठी निवड झालेले आहेत.
आयटी इंडस्ट्रीजमधील संघटना नॅस्कॉमने म्हटले आहे की, या वर्षी आम्ही उच्च स्तराच्या व्यावसायिकांसााठीच व्हिसासाठी अर्ज करणार आहोत. त्यामुळे कनिष्ठ स्तरावरील कॉम्प्युटर प्रोग्रामरची संख्या आपोआप कमी होईल. कॉम्प्युटर क्षेत्रात उच्च स्तराच्या व्यावसायिकांत विश्लेषक, सॉफ्टरवेअर डेव्हलपर्स आणि नेटवर्क प्रशासक यांचा समावेश होतो. भारतीय आयटी उद्योग हा एच १ बी व्हिसाचा उपयोग करणारा सर्वांत मोठा उद्योग आहे. या माध्यमातून कर्मचारी अमेरिकेत जातात. अमेरिकेने ३१ मार्च रोजी एक निवेदन जाहीर करून, या नोकऱ्या जटिल
आहेत आणि त्यासाठी प्रोफेशनल शिक्षणाची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>दोन वर्षांची पदवी अपुरी
वॉशिंंग्टन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री असोसिएशनचे सीईओ मायकल श्यूत्झलर यांनी म्हटले की, यासाठी दोन वर्षांची कॉम्प्युटर सायन्सची पदवीची अट पुरेशी नाही. एकूणच, एच १ बी व्हिसातील जाचक अटींमुळे भारतातील आयटी क्षेत्रापुढे संकट आल्याचे सांगितले जात असले तरी यामुळे प्रतिभावान कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या संधी खुल्या होणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.

Web Title: The advantage of tough visa rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.