Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

Personal Loan : अलीकडच्या काळात पर्सनल लोन फार लोकप्रिय होत आहे. लोक एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेत असल्याचेही समोर आलं आहे. मात्र, हा निर्णय खरच योग्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:43 PM2024-11-06T14:43:36+5:302024-11-06T14:46:22+5:30

Personal Loan : अलीकडच्या काळात पर्सनल लोन फार लोकप्रिय होत आहे. लोक एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेत असल्याचेही समोर आलं आहे. मात्र, हा निर्णय खरच योग्य आहे का?

advantages and disadvantages of taking more than one personal loan | तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

Personal Loan: गेल्या काही वर्षांपासून बाजारात अनेक प्रकारची कर्जे उपलब्ध होऊ लागली आहे. यातही सर्वाधिक लोकप्रिय आहे पर्सनल लोन. कुठल्याही कागपत्रांशिवाय तुम्हाला ५ ते १० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था सहज देते. आर्थिक समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीही येऊ शकतात. अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्ज घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. वैद्यकीय आणीबाणी किंवा लग्नाचा खर्च भागवणे अशा अनेक कारणांसाठी लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेतात. अनेक वेळा जास्त आर्थिक समस्यांमुळे लोकांच्या मनात दुसरे पर्सनल लोन घेण्याचा विचार येतो. लोक एकामागून एक पर्सनल लोन घेतात, पण एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेणे योग्य आहे का?

एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, त्याचे अनेक तोटे देखील आहेत. तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतल्यास तुम्ही कर्जाची परतफेड कशी करता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.

एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेण्याचे फायदे
तुमच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळलं तर पर्सनल लोन तुमच्यासाठी देवदुतापेक्षा कमी नाही. मात्र, कर्ज घेऊनही तुमची पैशांची गरज भागली नाही. तर तुम्ही दुसरे पर्सनल लोन घेऊ शकता. या कर्जप्रकाराचा हा फायदा आहे. तुम्हाला जवळपास सर्वच बँका पर्सनल लोन ऑफर करतात. 

एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेण्याचे तोटे
तुम्ही एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुमच्यावरचा आर्थिक भार लक्षणीय वाढतो. तुम्हाला दरमहा EMI मध्ये जास्त पैसे द्यावे लागतील. परिणामी तुमचा मासिक खर्च वाढेल. वैयक्तिक कर्जावर आकारले जाणारे व्याजदर खूप जास्त असते. अशा परिस्थितीत दोन कर्ज एकत्र घेतल्याने तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरलाही हानी पोहोचेल. दोन कर्जे एकत्र घेतल्यास, तुम्ही बचत करू शकणार नाही आणि तुमचे अर्धे उत्पन्न कर्जाच्या EMI मध्ये जाईल.

गेल्या २ वर्षातील आकडेवारी पाहिली तर पर्सनल लोन घेणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, यामुळे लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीतच पर्सनल लोन घ्यावे असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात.

 

Web Title: advantages and disadvantages of taking more than one personal loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.