जाहिरात बातमी आवश्यक गांधीग्राम-धामणा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात जि.प. सदस्य गवळेंच्या प्रयत्नांना यश
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
बोरगाव वैराळे - गांधीग्राम-धामणा-बोरगाव वैराळे रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी रुपये निधी खर्चून करण्यात आले होते. नेर धामणा बॅरेजवरील अतिजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळणी झाली. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जि.प. सदस्य महादेव गवळे यांनी एक वर्षापासून पाठपुरावा केला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.
बोरगाव वैराळे - गांधीग्राम-धामणा-बोरगाव वैराळे रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी रुपये निधी खर्चून करण्यात आले होते. नेर धामणा बॅरेजवरील अतिजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळणी झाली. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणेदेखील कठीण झाले होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जि.प. सदस्य महादेव गवळे यांनी एक वर्षापासून पाठपुरावा केला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.गांधीग्राम-धामणा-बोरगाव वैराळे हा मार्ग दहीहांडा-दर्यापूर-अमरावती परिसरातील जनतेला विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथे जाण्यासाठी सर्वात कमी अंतराचा असल्याने पायी व खासगी वाहनाने शेकडो भाविक दररोज ये-जा करीत असतात. तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाविकांच्या सोयीसाठी जि.प. सदस्य गवळे यांच्या मागणीवरून एस.टी. बस देखील सुरू केली होती. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने तीनच दिवसांत बससेवा बंद करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत महादेवराव गवळे यांनी नेर धामणा बॅरेजचे प्रकल्पप्रमुख यांच्याकडे दुरुस्तीसाठी साकडे घातले व दोन दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच या रस्त्याचे डांबरीकरणदेखील करण्यात येणार असल्याचे जि.प. सदस्य महादेव गवळे यांनी यावेळी सांगितले (वा.प्र.)(८ बाय ९ मध्ये घ्यावी)