Join us

जाहिरात महसूल यंदा १२ टक्क्याने वाढणार, वृत्तपत्रांना मात्र सर्वांत कमी महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:25 AM

भारतातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने २०१८ साली जाहिरातींसाठी तब्बल ५९,५३० कोटी खर्च करणार आहेत. ही वाढ १२ टक्के असून डिजिटल माध्यमांचा महसूल २५ टक्क्याने वाढेल

मुंबई : भारतातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने २०१८ साली जाहिरातींसाठी तब्बल ५९,५३० कोटी खर्च करणार आहेत. ही वाढ १२ टक्के असून डिजिटल माध्यमांचा महसूल २५ टक्क्याने वाढेल, तर वृत्तपत्रांचा महसूल पाच टक्क्याने वाढेल, असे भाकीत पिच मॅडिसन अ‍ॅडव्हर्टायझिंग अहवालाने केले आहे.मॅडिसन वर्ल्ड या जाहिरात कंपनीचे अध्यक्ष सॅम बलसारा म्हणाले, एकूण महसूल जरी १२ टक्क्याने वाढणार असला तरी डिजिटल माध्यमांना सर्वांत जास्त (२५ टक्के) वाटा मिळेल. त्यानंतर सिनेमाचा महसूल १४ टक्के, टेलिव्हिजन जाहिरातींवर १३ टक्के, रेडिओ व होर्डिंग्जवर १० टक्के तर वृत्तपत्रांच्या महसुलात फक्त पाच टक्के वाढ होईल.