Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘आॅडी’ची नजर आता छोट्या शहरांवर

‘आॅडी’ची नजर आता छोट्या शहरांवर

ईशान्य भारतासह देशातील सर्वच छोट्या आणि मध्यम शहरांवर आपण लक्ष केंद्रित करीत आहोत, असे लक्झरी कारचे उत्पादन करणाऱ्या ‘आॅडी इंडिया’तर्फे सांगण्यात आले.

By admin | Published: July 1, 2016 04:44 AM2016-07-01T04:44:12+5:302016-07-01T04:44:12+5:30

ईशान्य भारतासह देशातील सर्वच छोट्या आणि मध्यम शहरांवर आपण लक्ष केंद्रित करीत आहोत, असे लक्झरी कारचे उत्पादन करणाऱ्या ‘आॅडी इंडिया’तर्फे सांगण्यात आले.

'Ady' now looks at smaller cities | ‘आॅडी’ची नजर आता छोट्या शहरांवर

‘आॅडी’ची नजर आता छोट्या शहरांवर


गुवाहाटी : ईशान्य भारतासह देशातील सर्वच छोट्या आणि मध्यम शहरांवर आपण लक्ष केंद्रित करीत आहोत, असे लक्झरी कारचे उत्पादन करणाऱ्या ‘आॅडी इंडिया’तर्फे सांगण्यात आले.
सध्या महागड्या मोटारींमध्ये लोकांची आवड वाढत चालली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी हे धोरण आखले जात असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. आॅडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यादृष्टीने आमच्यासाठी भारताचा ईशान्य प्रदेश महत्त्वाचा टापू आहे. या क्षेत्रात ‘आॅडी’चे नवीन ग्राहक शोधण्यावर आम्ही भर देत आहोत. ते म्हणाले की, छोट्या शहरातसुद्धा महागड्या कारचे लोक शौकीन बनत आहेत.
छोट्या आणि मध्यम शहरात लोकांची संख्या कमी आहे. तेथे विक्रीही कमी आहे; पण आता तेथील विक्री ३० टक्के दराने वाढत आहे. महानगरात विक्रीचा वेग १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. (वृत्तसंस्था)
>भरघोस विक्री
गेल्यावर्षी ११, १९२ गाड्यांची विक्री झाली होती. त्यातील २० टक्के विक्री द्वितीय आणि त्रिस्तरीय शहरात झाली, असेही ते म्हणाले.

Web Title: 'Ady' now looks at smaller cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.