शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांना एक्सपर्ट्स नेहमीच दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असतात. कारण दिर्घ काळात चांगला परतावा मिळू शकतो. काहिशी अशीच स्थिती Aegis Logistic च्या पोझिशनल गुंतवणूकदारांसोबतही घडली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या 10 वर्षांत तब्बल 3000 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
3000 टक्क्यांचा बंपर परतावा -
ईकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने Aegis Logistic मध्ये गेल्या 10 वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे 3 लाख रुपये झाले असते. अर्थात या कालावधीत पोझिशनल गुंतवणूकदारांना 3000 टक्क्यांचा फायदा झाला आहे. गेल्या एका महिन्याच्या काळात या मल्टिबॅगर स्टॉकच्या किंमतीत 15 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांपासून होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांचा फायदा होऊ शकतो.
प्रमोटर्सकडे आहे 58 टक्के हिस्सेदारी -
कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार प्रमोटर्सकडे 58 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. तर, जनतेकडे 41.9 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. पब्लिक शेअर होल्डिंगमध्ये म्युचुअल फंड्सकडे 5 टक्क्यांची हिस्सेदारी आहे, तर परदेशी गुंतवणूकदारांकडे 17 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा (टॅक्सनंतर) 152 कोटी रुपये एवढा होता. वार्षिक आधारावर नफ्यात 7 टक्क्यांची वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. मात्र, कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत कंपनीचा एकूण रेव्हेन्यू 1873 कोटी रुपये होता.