Lokmat Money > बिझनेस न्यूज > एरोसोल बाजार गाठणार १ अब्ज डॉलर्सचा पल्ला

एरोसोल बाजार गाठणार १ अब्ज डॉलर्सचा पल्ला

२०, २१ फेब्रुवारीला इंडियन एरोसोल्स एक्स्पो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 06:52 AM2023-01-18T06:52:19+5:302023-01-18T06:52:57+5:30

२०, २१ फेब्रुवारीला इंडियन एरोसोल्स एक्स्पो

Aerosol market to reach 1 billion dollars | एरोसोल बाजार गाठणार १ अब्ज डॉलर्सचा पल्ला

एरोसोल बाजार गाठणार १ अब्ज डॉलर्सचा पल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंडिया एरोसोल एक्स्पो हा भारतातील एरोसोल फवारणी उद्योगाला वाहून घेतलेला व्यापार मेळावा असून, नवी दिल्लीतील प्रगती मैदान, हॉल २ मध्ये २० आणि २१ फेब्रुवारी रोजी पाचव्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणारा आयएई हा मुख्य प्रवाहातील एकमेव मंच असून भारतात त्यांच्यामार्फत एरोसोलविषयक उत्पादने तसेच मध्यस्थांशी संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचे प्रदर्शन मांडले जाते. देशांतर्गत एरोसोल बाजाराचे वर्तमान मूल्य सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्स इतके असून २०३० सालापर्यंत ते १.३ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एक्स्पोमध्ये जागतिक आणि भारतीय कल, उत्पादकता वाढवण्यासाठी तांत्रिक पॅनल आणि भविष्यातील विकासाला चालना देणारे तांत्रिक नावीन्यपूर्ण उपक्रम यावर चर्चा करण्यासाठी परिसंवाद व परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय एरोसोल ब्रँड्स भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. भारतात संयुक्त उपक्रम, व्यापार युती आणि / किंवा करार उत्पादनासाठी भागीदार शोधण्यासाठी ते या वैशिष्ट्यपूर्ण एक्स्पोची उत्सुकतेने वाट बघत असतात. - संजय मल्होत्रा, अध्यक्ष, आयएई आयोजन समिती

Web Title: Aerosol market to reach 1 billion dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.