Join us

Aesthetik Engineers IPO Listing: याला म्हणतात लिस्टिंग! पहिल्याच दिवशी 'या' IPO नं केला पैसा दुप्पट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:34 AM

Aesthetik Engineers IPO Listing: पहिल्याच दिवशी कंपनीनं पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड ५५ ते ५८ रुपये होता.

Aesthetik Engineers IPO Listing: इंटिरिअर डिझाइन सेवा पुरवणाऱ्या एस्थेटिक इंजिनिअर्सच्या शेअर्सने आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर तुफान एन्ट्री केली. कंपनीचा आयपीओ आज म्हणजेच १६ ऑगस्ट २०२४ रोजी एनएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमसह ११०.२० रुपयांवर लिस्ट झाला. पहिल्याच दिवशी कंपनीनं पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड ५५ ते ५८ रुपये होता.

शेअर खरेदीसाठी उड्या

गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे कंपनीच्या धमाकेदार लिस्टिंगनंतरही खरेदीदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सना काही वेळातच अप्पर सर्किट लागलं. ५ टक्क्यांच्या तेजीनंतर कंपनीचा शेअर ११५.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. 

कंपनीचा आयपीओची साईज २६.४७ कोटी रुपये होती. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीनं ४५.४६ लाख शेअर्स जारी केले आहेत. हे पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित होते. गुंतवणूकदारांना ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. आयपीओची लॉट साइज २००० शेअर्सची होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख १६ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती.

आयपीओला ७०५ पट सब्सक्रिप्शन

तिसऱ्या दिवशी हा आयपीओ ७०५ पट सब्सक्राइब झाला. नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीत आयपीओ १९३३.९६ पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओला पहिल्या दिवशी २६.४३ पट तर दुसऱ्या दिवशी ५२.२१ पट सब्सक्रिप्शन मिळाले. कंपनीनं अँकर इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून ७.५२ कोटी रुपये उभे केले होते. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा कंपनीत एकूण १०० टक्के हिस्सा होता. जे आता ७३.५० टक्क्यांवर आला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक