Join us  

Aether Industries Listing Price: स्टॉक मार्केटमध्ये एथर इंडस्ट्रीजचं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 3:12 PM

Aether Industries Listing Price: लिस्टिंगच्या दिवशी, एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मालामाल केलं आहे.

Aether Industries Listing Price: लिस्टिंगच्या दिवशी, एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मालामाल केलं आहे. विशेष केमिकल बनवणारी कंपनी एथर इंडस्ट्रीजचे शेअर्स शुक्रवारी 642 रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत 10 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. बीएसईवर शेअर्स 706.15 रुपयांवर उघडले. हे इश्यू प्राईजपेक्षा 9.99 टक्क्यांनी अधिक होते. नंतर, शेअरची किंमत 20.99 टक्क्यांनी वाढून 776.75 रुपये झाली. म्हणजेच ज्याने त्यात एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याच्या एक लाखाचे मूल्य आता 121000 रुपयांच्या जवळपास झाले आहे.

एथर इंडस्ट्रीजचे शेअर्स NSE वर 9.65 टक्के प्रीमियमसह 704 रुपयांवर लिस्ट झाले. सकाळी 10:11 वाजेपर्यंत, एनएसईवर एथर इंडस्ट्रीजचे शेअर्स 20.62 टक्क्यांच्या उसळीसह 774.40 रुपयांवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, बीएसईवर 10.00 टक्क्यांच्या वाढीसह 776.75 रुपयांवर होता.

स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी एथर इंडस्ट्रीजचा IPO शेवटच्या दिवशी 6.26 पट सबस्क्राइब झाला. सुरुवातीच्या शेअर विक्रीमध्ये ₹627 कोटी पर्यंतचे नवीन इश्यू आणि 28,20,000 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश होता. ही ऑफर 24-26 मे 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुली होती. याशिवाय याचे प्राईज रेंज ₹610-642 इतकं निश्चित करण्यात आलं होतं. एथर इंडस्ट्रीजने पब्लिक इश्यूच्या आधी अँकर इन्व्हेस्टर्सकडून ₹240 कोटींहून अधिक रक्कम जमा केली होती.

उभारण्यात आलेल्या पैशाचं काय करणार?कंपनी IPO द्वारे उभारलेले पैसे गुजरातमधील सुरत येथे प्रस्तावित नवीन प्रकल्पासाठी वापरणार आहे. यासोबतच कंपनी याद्वारे कर्जही भरणार आहे. एथर इंडस्ट्रीजने 2017 मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले होते.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग