Lokmat Money > बिझनेस न्यूज > JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

आयपीओसाठी मिळाली बाजार नियामकाकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:16 PM2023-09-14T13:16:36+5:302023-09-14T13:16:53+5:30

आयपीओसाठी मिळाली बाजार नियामकाकडून मंजुरी

After 13 years Jindal group company s IPO will come earning opportunity got sebi approval | JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

जेएसडब्ल्यू (JSW) इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (SEBI) आयपीओसाठी (IPO) मंजुरी मिळाली आहे. या कंपनीनं आयपीओद्वारे २८०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. मे महिन्यात या जेएसडब्ल्यू समूहाच्या कंपनीनं आपल्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर सादर केला होता. या आयपीओचा उद्देश कर्जाची परतफेड करणं आणि त्यांच्या क्षमतेच्या विस्तार योजनांसाठी निधी उभारण्याचा आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीवरील कर्ज ₹२,८७५ कोटी होतं.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, क्रेडिट सुइस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिडेट याचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

१३ वर्षानंतर लिस्टिंग
जेएसडब्ल्यू समूहाच्या कंपनीचा आयपीओ तब्बल १३ वर्षांनी येत आहे. यापूर्वी, जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड जानेवारी २०१० मध्ये लिस्ट झाली होती. स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही समूहाची तिसरी कंपनी असेल. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील हा समूह सिमेंट, पेंट, व्हेंचर कॅपिटल इत्यादी व्यवसायात सक्रिय आहे.

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही कार्गो हँडलिंग क्षमतेच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर आहे. ज्यामध्ये ड्राय बल्क, ब्रेक बल्क, लिक्विड बल्क, गॅसेस आणि कंटेनर्ससह मल्टी-कमोडिटी कार्गोसाठी दरवर्षी १५३.४३ दशलक्ष टन कार्गो हँडलिंग क्षमता आहे. 

Web Title: After 13 years Jindal group company s IPO will come earning opportunity got sebi approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.