Join us

३२ तिमाहीनंतर भारताचे चालू खाते होणार शिलकी

By admin | Published: February 09, 2015 12:44 AM

जानेवारी-मार्च या तिमाहीत भारताचे चालू खाते शिलकी होण्याची शक्यता आहे. ३२ तिमाहीनंतर प्रथमच असे होणार आहे.

नवी दिल्ली : जानेवारी-मार्च या तिमाहीत भारताचे चालू खाते शिलकी होण्याची शक्यता आहे. ३२ तिमाहीनंतर प्रथमच असे होणार आहे. त्याबरोबरच येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात भारताच्या चालू खात्यातील तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.६ टक्का होण्याची शक्यता आहे.जागतिक ब्रोकरेज कंपनी एचएसबीसीने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे भारताला मोठा लाभ झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून चालू खात्यातील तूट भरून निघणार आहे. एचएसबीसीचे अर्थतज्ज्ञ प्रांजल भंडारी आणि पृथ्वीराज श्रीनिवास यांनी सांगितले की, गेल्या ३२ तिमाहींपासून भारताच्या चालू खात्यात तूट आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत ही तूट भरून निघेल, असा आमचा अंदाज आहे. जून २0१४ ते जानेवारी २0१५ या काळात कच्च्या तेलाच्या किमती अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाल्या आहेत. परिणामी, भारताच्या आयातीचे बिलही कमी झाले आहे. अमेरिकेतील तेल आणि शैल गॅस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तेलाच्या किमती उतरल्या आहेत. ओपेकने तेल उत्पादन कमी करण्याचे नाकारल्याचाही किमतींवर परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यातच तेलाच्या किमती ६0 टक्के कमी झाल्या आहेत.