Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Vodafone Idea Recharge Plan: यापूर्वी एअरटेल आणि रिलायन्स जिओनं मोठा बदल केला होता. त्यानंतर आता व्होडाफोन आयडियानंही आपल्या प्लान्समध्ये मोठा बदल केलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:06 IST2025-01-24T12:05:03+5:302025-01-24T12:06:21+5:30

Vodafone Idea Recharge Plan: यापूर्वी एअरटेल आणि रिलायन्स जिओनं मोठा बदल केला होता. त्यानंतर आता व्होडाफोन आयडियानंही आपल्या प्लान्समध्ये मोठा बदल केलाय.

After Airtel and Jio vodafone idea followed TRAI s rules big change was made launched calling sms pack | Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Airtel आणि Jio नंतर Vi वरही TRAI च्या नियमाचा परिणाम, केला 'हा' मोठा बदल

Vodafone Idea Recharge Plan: ट्रायनं काही दिवसांपूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिटसह रिचार्ज प्लान्स देण्याचे आदेश दिले होते. डेटा न वापरणाऱ्या युजर्सना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणं हा त्यामागचा उद्देश होता. ट्रायनं आपल्या आदेशात म्हटल्यानुसार, कंपन्यांना त्यांच्या विद्यमान रिचार्ज प्लानसह ज्यात केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे आहेत असतील असे प्लान आणावे, असं म्हटलं होतं. ज्यांना डेटाची गरज नाही त्यांच्यासाठी असे प्लान आवश्यक आहेत. फीचर फोन युजर्ससोबतच २ सिम वापरणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे.

ट्रायच्या या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलनं केवळ कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लॅन आणले होते. आता व्हीआयनंही (Vodafone Idea) केवळ कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लान सादर केलेत.

व्हीआयच्या या नव्या प्लानमुळे डेटा न वापरणाऱ्या युजर्सना मोठा फायदा होणार आहे. व्हीआयचा नवीन रिचार्ज प्लान एक दीर्घ वैधता असलेला रिचार्ज प्लान आहे. व्हीआयचा हा प्लॅन युजर्स १४६० रुपयांत खरेदी करू शकतात. जाणून घेऊया व्हीआयच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल.

व्हीआयचा १४६० रुपयांचा प्लॅन

व्हीआयचा १४६० रुपयांचा प्लान २७० दिवसांच्या म्हणजेच पूर्ण ९ महिन्यांची वैधतेसह येतो. व्हीआयच्या या प्लानमध्ये युजरला लाँग व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. एसएमएसबद्दल बोलायचं झालं तर या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये युजरला कोणताही डेटा बेनिफिट मिळत नाही.

Web Title: After Airtel and Jio vodafone idea followed TRAI s rules big change was made launched calling sms pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.