Lokmat Money > बिझनेस न्यूज > अखेर एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रभाव लोकमतचा

अखेर एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रभाव लोकमतचा

अकोला : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाला भ्रष्टाचाराने पोखरल्याची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उशिरा का होईना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या विभागातील तीन कर्मचार्‍यांच्या २५ सप्टेंबर रोजी तडकाफडकी बदल्या केल्या. कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर प्रशासनाने एलबीटी चुकविणार्‍या व्यावसायिकांविरोधात तीव्र मोहीम उघडण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

By admin | Published: September 26, 2014 09:40 PM2014-09-26T21:40:59+5:302014-09-26T21:40:59+5:30

अकोला : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाला भ्रष्टाचाराने पोखरल्याची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उशिरा का होईना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या विभागातील तीन कर्मचार्‍यांच्या २५ सप्टेंबर रोजी तडकाफडकी बदल्या केल्या. कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर प्रशासनाने एलबीटी चुकविणार्‍या व्यावसायिकांविरोधात तीव्र मोहीम उघडण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

After all, the effect of transfers of employees in the LBT division | अखेर एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रभाव लोकमतचा

अखेर एलबीटी विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रभाव लोकमतचा

ोला : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाला भ्रष्टाचाराने पोखरल्याची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उशिरा का होईना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या विभागातील तीन कर्मचार्‍यांच्या २५ सप्टेंबर रोजी तडकाफडकी बदल्या केल्या. कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यानंतर प्रशासनाने एलबीटी चुकविणार्‍या व्यावसायिकांविरोधात तीव्र मोहीम उघडण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. मालमत्ता कर विभागाकडून वसुलीसाठी मोहीम तीव्र करण्यात आली असतानाच एलबीटी विभागाच्या वसुलीत प्रचंड घसरण आली आहे. घाम गाळूनदेखील चार कोटीच्यावर उत्पन्न प्राप्त होत नसल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. एलबीटीची नोंदणी झालेल्या व्यावसायिकांच्या व्यतिरिक्त मोठ्या आर्थिक उलाढाली करणार्‍या अनेक बड्या व्यावसायिकांना एलबीटीतून सूट देण्याचे काम एलबीटी विभागाने चालवले होते. गुटखा माफियांसह टाइल्स, सिमेंट, सिगारेटचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांसोबत हातमिळवणी करून अनेकांनी खिसे भरण्याचे उद्योग चालवले होते. परिणामी एलबीटीच्या वसुलीत वाढ होण्याऐवजी त्यामध्ये घसरण होत असल्याची वस्तुस्थिती लोकमतने उजेडात आणली. या सर्व बाबींचा विचार करता, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी एलबीटी विभागातील लिपिक उमेश सटवाले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी रवी लोखंडे, संतोष सूर्यवंशी यांची तडकाफडकी बदली केली. रवी लोखंडे, संतोष सूर्यवंशी यांना प्रत्येकी पूर्व व उत्तर झोनमध्ये रुजू होण्याचे आदेश असून, लिपिक उमेश सटवाले यांना उपायुक्त चिंचोलीकर यांच्या कार्यालयात नियुक्त होण्याचे फर्मान बजावण्यात आले.

बॉक्स....
एलबीटी चुकविणार्‍यांना अभय का?
वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणार्‍या काही मोजक्या व्यावसायिकांना एलबीटीतून सूट दिल्या जाते. अर्थातच, हा पैसा काही कर्मचार्‍यांच्या खिशात जमा होत होता. अशा एलबीटी चुकविणार्‍या व्यावसायिकांविरोधात उपायुक्तांनी धडक तपासणी मोहीम उघडण्याची नितांत आवश्यकता आहे.

Web Title: After all, the effect of transfers of employees in the LBT division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.