Join us

तब्बल ७ वर्षांनी टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांना मिळणार बोनस, 'अशी' होणार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 2:19 PM

टाटा मोटर्सबाबत बोलाल तर मागील ७ वर्ष या कंपनीने गुंतवणूकदारांना डिविडेंट दिला नाही.

मुंबई - देशातील दिग्गज उद्योगपती घराणे टाटा ग्रुप नेहमी त्यांच्या लोकांच्या हितकारक निर्णयासाठी ओळखले जाते. ज्यात कंपनीसोबत लोकांचाही फायदा होतो. देशातील सर्वात छोटी कार आणण्याचे श्रेय असो वा मीठाच्या माध्यमातून लोकांच्या किचनपर्यंत असो, टाटा ग्रुपने सर्वात आधी त्यांच्या ग्राहकांचे हित लक्षात घेतले आहे. आता टाटा ग्रुप कंपनी असाच काही निर्णय घेण्याच्या तयारी आहे.

टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्स ही घोषणा करणार आहे. जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. टाटा मोटर्स तब्बल ७ वर्षांनी गुंतवणूकदारांना डिविडेंट देणार आहे. हे डिविडेंट काय असते ज्याने गुंतवणूकदारांना फायदा होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

कंपन्या वेळोवेळी गुंतवणूकदारांना शेअरवर डिविडेंट देते. टाटा मोटर्सबाबत बोलाल तर मागील ७ वर्ष या कंपनीने गुंतवणूकदारांना डिविडेंट दिला नाही. शेअर बाजारात मागील महिन्यांपासून अनेक कंपन्यांनी डिविडेंटची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सची १२ मे रोजी बोर्ड मिटिंग होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बोर्डाच्या या बैठकीत गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची घोषणा केली जाऊ शकते. मागील काही वर्षापासून ऑटो कंपन्या तोट्यात जात आहेत. विशेषत: कोरोना काळात ऑटो सेक्टरचे खूप नुकसान झाले. त्यामुळे अनेक कंपन्यांनी डिविडेंट देणे बंद केले. 

१२ मे महत्त्वाचा दिवसआर्थिक वर्ष २०१६ मध्ये टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची घोषणा केली होती. आता कंपनीला तगडा फायदा झाला आहे. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी टाटा मोटर्स कंपनी गुंतवणूकदारांना खुश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची तिमाही कामगिरी जबरदस्त झाली. टाटा मोटर्सने ३०४३ कोटी फायदा कमावला. ८८ हजार कोटीहून अधिक विक्री झाली. आता १२ मे रोजी कंपनीचा चौथ्या तिमाहीचा रिपोर्ट येणार आहे. त्यानंतर कंपनी डिविडेंटची घोषणा करू शकते. 

काय असतो डिविडेंट? डिविडेंट हा एकप्रकारचा बोनस असतो जो कंपनी शेअरहोल्डर्सना देते. ज्यांनी टाटा मोटर्सचे शेअर खरेदी केले आहेत. त्या गुंतवणूकदारांना कंपनी बोनस जारी करेल. सोप्या भाषेत समजायचं झाले तर कंपनीला जेव्हा फायदा होतो तेव्हा कंपनी त्यातील काही हिस्सा बोनस म्हणून गुंतवणूकदारांना देते. पण त्यासाठी कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असायला हवेत. 

टॅग्स :टाटाशेअर बाजार