Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाजपनंतर आता सेन्सेक्सचाही आपटबार

भाजपनंतर आता सेन्सेक्सचाही आपटबार

बिहारातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे शेअर बाजारांत सोमवारी सकाळच्या सत्रात मोठा गडगडाट झाला. तथापि, सत्राच्या अखेरीस खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजार सावरले.

By admin | Published: November 9, 2015 10:12 PM2015-11-09T22:12:59+5:302015-11-09T22:12:59+5:30

बिहारातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे शेअर बाजारांत सोमवारी सकाळच्या सत्रात मोठा गडगडाट झाला. तथापि, सत्राच्या अखेरीस खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजार सावरले.

After the BJP, the platform of the Sensex has now become challenging | भाजपनंतर आता सेन्सेक्सचाही आपटबार

भाजपनंतर आता सेन्सेक्सचाही आपटबार

मुंबई : बिहारातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे शेअर बाजारांत सोमवारी सकाळच्या सत्रात मोठा गडगडाट झाला. तथापि, सत्राच्या अखेरीस खरेदीचा जोर वाढल्यामुळे बाजार सावरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी ६00 अंकांनी घसरला होता. नंतर ही घसरण कमी होऊन १४४ अंकांवर आली व सेन्सेक्स २६,१२१.४0 अंकांवर बंद झाला.
बाजार घसरणार हे गृहीतच होते. अपेक्षेप्रमाणे सकाळी बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. भाजपच्या पराभवाने अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्वाळा फिच या संस्थेने दिल्यानंतर बाजारात पुन्हा खरेदीचा उत्साह दिसून आला. याशिवाय सिटीग्रुप, नोमुरा आणि बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंच या संस्थांनीही अर्थव्यवस्थेला धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्याचाही लाभ बाजारांना झाला.
सेन्सेक्सच्या घसरणीचे हे सलग चौथे सत्र ठरले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळच्या सत्रात २६ हजार अंकांच्या खाली घसरला होता. नंतर त्यात सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस मात्र १४३.८४ अंकांची अथवा 0.५५ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,१२१.४0 अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा महिनाभराचा नीचांक ठरला आहे.
गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ३२५.३५ अंक गमावले आहेत. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही सकाळी ७,८00 अंकांच्या खाली आला होता. नंतर झालेल्या खरेदीमुळे त्यात सुधारणा झाली. सत्राच्या अखेरीस ३९.१0 अंकांची अथवा 0.४९ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ७,९१५.२0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. सन फार्माचा समभाग सर्वाधिक ५.८२ टक्क्यांनी घसरला. कंपनीचा नफा ४६ टक्क्यांनी घसरल्याचा हा परिणाम असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. घसरण झालेल्या अन्य बड्या कंपन्यांत भेल, डॉ. रेड्डीज, गेल, विप्रो, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, एलअँडटी, कोल इंडिया, ओएनजीसी, हिंदाल्को, एनटीपीसी, भारती एअरटेल, टीसीएस, बजाज आॅटो यांचा समावेश आहे.
क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक २.२0 टक्क्यांनी घसरला. हेल्थकेअर, इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपिटल गुड्स, पॉवर, ऊर्जा आणि बँकिंग हे निर्देशांकही घसरले. व्यापक बाजारांत मात्र वाढीचा कल दिसून आला. स्मॉलकॅप 0.७८ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.४२ टक्क्यांनी वाढला. (वृत्तसंस्था)

राज्याच्या निवडणुकाही महत्त्वाच्या

सध्याच्या सरकारकडे लोकसभेत स्वत:च्या २८२ आणि घटक पक्षांच्या अशा मिळून एकूण ३३० जागा आहेत. परंतु, राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. परिणामी, आर्थिक सुधारणांची अनेक विधेयके मंजूर करणे जिकिरीचे आहे. राज्यसभेत सध्या कॉँग्रेस पक्षाचे बहुमत आहे.
२०१७ पर्यंत अनेक जागा रिक्त होऊन त्या जागी नव्या नियुक्त्या होतील. जर विविध राज्यांत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले तर तेथील राज्य सरकारांच्या कोट्यातून भाजपला स्वत:च्या राज्यसभेतील जागा वाढविणे शक्य होईल. परंतु, अनेक ठिकाणी भाजपची स्वबळावर सत्ता नाही किंवा बिहारमध्ये जो झटका बसला आहे, त्यामुळे खासदारांची संख्या आणि पर्यायाने राज्यसभेतील बहुमताचा मार्ग अडथळ््यांचा ठरत आहे.
यामुळेच आर्थिक सुधारणा अडकण्याचे संकेत मिळत आहेत. याचाच परिणाम, बाजाराच्या कामगिरीवरही उमटताना दिसत आहे.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँगचा सँग हेंग 0.६१ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई मात्र १.९६ टक्क्यांनी वर चढला. युरोपीय बाजारांत सकाळी किंचित स्वरूपाची तेजी दिसून आली.
दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचे सौदे
गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारांत मुहूर्ताचे सौदे होणार आहेत.
सायंकाळी ५.४५ ते ६.४५ या दरम्यान हे सौदे दोन्ही बाजारांत होतील, असे बाजारांच्या वतीने सांगण्यात आले.
रु पयाही पडला
शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे त्याचा परिमाण चलनावर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रु पयात दिवसभरात ६८ पैशांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रु पया ६६ रु पये ४४ पैशांच्या पातळीवर स्थिरावला.

Web Title: After the BJP, the platform of the Sensex has now become challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.