Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृष‍ी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 4, 2021 11:38 AM2021-02-04T11:38:12+5:302021-02-04T11:39:20+5:30

नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृष‍ी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

After the budget oil companies petroleum fuel rates hike Petrol diesel price | अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

Highlightsनकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृष‍ी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मुंबईत पेट्रोल 93.20 रुपये आणि डिझेल 83.67 रुपये लिटरएलपीजी सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता नागरिकांना महागाईचा झटका बसणार आहे. काही दिवस शांत राहिल्यानंतर आता गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डीजलच्या दरात प्रत्येकी प्रति लिटर 35-35 पैशांची वाढ केली आहे. याच प्रकारे एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याच बरोबर दिल्ली येथे पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 86.65 रुपयांवर पोहोचला आहे.

नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृष‍ी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

किती झाला LPG सिलिंडरचा दर - 
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 14 किलोच्या नॉन सब्सिडी घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे आता दिल्लीत सिलिंडरचा दर 719 रुपये, कोलकात्यात 745.50 रुपये, मुंबईत 710 तर चेन्नईमध्ये 735 रुपयांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. असे असले तरी, भारतीय बॉस्केटसाठी जे कच्चे तेल येते, त्यावर आंतरराष्ट्रीय किमतीचा प्रभाव 20 ते 25 दिवसांनंतर दिसून येतो.

असे आहेत महत्वांच्या शहरांतील दर - 
दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.65 रुपयांवर पोहोचला. तर डिझेलचा दर 76.83 रुपयांवर पोहोचला आहे. याच बरोबर, मुंबईत पेट्रोल 93.20 रुपये आणि डिझेल 83.67 रुपये लिटर, चेन्नईत पेट्रोल 89.13 आणि डिझेल 82.04 रुपये लिटर, कोलकात्यात पेट्रोल 88.01 रुपया आणि डिझेल 80.41 रुपये लिटर, तर नोएडामध्ये पेट्रोल 85.91 रुपये आणि डिझेल 77.24 रुपये लीटरवर पोहोचले आहे.

महागाई वाढण्याचीही शक्यता -
नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे आता महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, डिझेल दरवाढीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होत असतो. यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढतो आणि माल वाहतुकीचा खर्च वाढला, की प्रत्येक वस्तू महाग होण्याची शक्यताही वाढते.
 

Read in English

Web Title: After the budget oil companies petroleum fuel rates hike Petrol diesel price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.