Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:11 AM2023-10-23T09:11:39+5:302023-10-23T09:30:25+5:30

अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे.

After cement, there will be excitement in the power sector! Adani Group is set to acquire another company | सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

सिमेंटनंतर आता वीज क्षेत्रात खळबळ उडणार! अदानी समुह आणखी एक कंपनी विकत घेणार

उद्योग समुहातील आघाडी समुह असलेला अदानी समुहात आता आणखी एका कंपनीचा समावेश होणार आहे. अदानी समूहाची अदानी पॉवर लवकरच दिवाळखोर कोस्टल एनर्जीचे अधिग्रहण करू शकते. यामुळे दक्षिणेकडील बाजारपेठेत अदानीचा वाटा वाढण्याची शक्यता आहे.

नीता अंबानींना पगार मिळत नव्हता, पण एका मीटिंगसाठी किती रुपये मिळायचे? जाणून थक्क व्हाल

एका अहवालानुसार, दोन दिवस चाललेल्या बोली प्रक्रियेत शनिवारी संध्याकाळी अदानी पॉवरची बोली विजेता म्हणून निवडण्यात आली. अहवालात या प्रकरणाशी संबंधित दोन लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दिवाळखोर वीज कंपनी कोस्टल एनर्जीच्या ताब्यात घेण्यासाठी बोली प्रक्रिया शुक्रवारी दुपारी सुरू झाली. ही प्रक्रिया शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहिली आणि यावेळी १८ फेऱ्यांमध्ये निविदा काढण्यात आल्या.

बोलीच्या १८ फेऱ्यांनंतर १९व्या फेरीत अदानी पॉवरला यश मिळाले, या बोलीतून इतरांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. शेरीशा टेक्नॉलॉजीने बोलीमध्ये भाग घेतला नाही, तर जिंदाल पॉवरने १९व्या फेरीत काउंटर बिड लावली नाही. शेवटच्या फेरीत, अदानी पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने ३,४४० कोटी रुपयांची बोली लावली.

कोस्टल एनर्जीन दिवाळखोर झाल्यानंतर कॉर्पोरेट दिवाळखोरीच्या प्रक्रियेत अदानी पॉवर सामील झाली. कंपनीचे पॉवर प्लांट कार्यरत आहेत. यामुळे अनेक कंपन्या कोस्टल एनर्जीच्या ताब्यात घेण्यास खूप रस दाखवत होत्या. यासाठी शेरीशा टेक्नॉलॉजीज, जिंदाल पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह यांच्याकडून निविदा आल्या. अदानी पॉवरने स्वारस्य अभिव्यक्ती सादर केली नाही, म्हणून नंतर बोलीसाठी डिकी अल्टरनेटिव्हशी भागीदारी केली.

कोस्टल एनर्जीचे तामिळनाडूमध्ये दोन कार्यरत ऊर्जा प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पांची क्षमता ६-६०० मेगावॅट आहे. कंपनीचा तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशनसोबत सक्रिय वीज खरेदी करार देखील आहे, जो सप्टेंबर २०२८ पर्यंत वैध आहे. कोस्टल एनर्जीनसाठी कर्मचारी आणि विविध कर्जदारांचे १२,२४७ कोटी रुपयांचे दावे स्वीकारण्यात आले. अदानींची ऑफर ३५ टक्के कर्ज दाव्यांच्या बरोबरीची आहे.

Web Title: After cement, there will be excitement in the power sector! Adani Group is set to acquire another company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.