अमरावती : राज्यातील भूविकास बँकेचे पुनरूज्जीवन करायचे की बँकेला कायमचे टाळे लावायचे, याविषयीचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. याप्रकरणी मंत्रिमंडळ उपसमितींच्या बैठकींना वेग आला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चौगुले समितीच्या अहवालातील शिफारशींचा विचार उपसमितीने करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली.
अडचणीतील भूविकास बँकेच्या २९ जिल्हा बँका व शिखर बँकांच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न नव्या सरकारात चर्चेत आला आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी भूविकास बँकप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा अंतिम निर्णय मुुख्यमंत्रीच घेतील, असेही स्पष्ट केले. मंत्रिमंडळाने २७ नोव्हेंबर २०१४ रोजी मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्तीचा निर्णय घेतला. १७ डिसेंबर रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती.
अधिवेशनानंतर भूविकास बँकप्रकरणी तोडगा
राज्यातील भूविकास बँकेचे पुनरूज्जीवन करायचे की बँकेला कायमचे टाळे लावायचे, याविषयीचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे.
By admin | Published: March 15, 2015 11:48 PM2015-03-15T23:48:11+5:302015-03-15T23:48:11+5:30