Lokmat Money > बिझनेस न्यूज > EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

यापूर्वी EaseMyTrip या कंपनीनं मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 10:41 AM2024-01-09T10:41:25+5:302024-01-09T10:41:57+5:30

यापूर्वी EaseMyTrip या कंपनीनं मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली.

After EaseMyTrip another major company insurance dekho boycot the Maldives not offering travel insurance pm modi comment | EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

EaseMyTrip नंतर आणखी एका मोठ्या कंपनीचा मालदीववर बहिष्कार, प्रवासासाठी विमा देणार नाही

lakshadweep Trip of PM Modi: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या या भेटीनंतर मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी यावर सोशल मीडियावर असभ्य टिप्पण्या केल्या. यानंतर मालदीव सरकारने तिन्ही मंत्र्यांना बडतर्फ केलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.  एकापाठोपाठ एक अनेकांनी मालदीववर बहिष्कार टाकायला सुरुवात केली. देशातील कंपन्या आणि व्यापारी संघटनांनीही यात साथ दिली मालदीवला आपापल्या परीनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयांवर एक नजर टाकूया.

'इन्शुरन्स देखो'कडूनही बहिष्कार

सर्व प्रथम, सोमवारी सकाळी, इज माय ट्रिपनं (EaseMyTrip) मालदीव सरकारच्या निषेधार्थ सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले. संध्याकाळपर्यंत, आणखी एक ट्रॅव्हल टेक स्टार्टअप InsuranceDekho देखील या मोहिमेत सामील झाले. कंपनीनं मालदीवला जाणाऱ्या लोकांचा प्रवास विमा निलंबित करण्याची घोषणा केली. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीटीओ ईश बब्बर यांनी लिंक्डइनवर (LinkedIn) यासंदर्भातील माहिती दिली. इन्शुरन्स देखो आपल्या देशासोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. आम्ही मालदीवसाठी कोणत्याही प्रकारचा विमा देणार नाही, असं ईश बब्बर यांनी स्पष्ट केलंय.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचंही आवाहन

यापूर्वी, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं पर्यटन व्यापार संघटनांना मालदीवच्या दौऱ्यांना प्रमोट करणं त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी मालदीवला जाणार्‍या सर्व एअरलाइन्सना मालदीवला जाणारी विमानं स्थगित करून उडान योजनेंतर्गत लक्षद्वीपसाठी उड्डाणं सुरू करण्याचं आवाहन केलं होतं.

EaseMyTrip चा मोठा निर्णय

EaseMyTrip या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाला समर्थन म्हणून EaseMyTrip नं मालदीवच्या सर्व विमानसेवांचे बुकिंग रद्द केलं आहे, असं निशांत पिट्टी यांनी सांगितलं.

EaseMyTrip सुरू करणार ‘चलो लक्षद्वीप’ अभियान

मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केल्यानंतर आता EaseMyTrip ‘चलो लक्षद्वीप’ अभियान सुरू करणार आहे. लक्षद्वीप येथील समुद्र किनारे मालदीवसारखेच सुंदर आहेत. EaseMyTrip प्राचीन स्थळांचे पर्यटन वाढण्यावर भर देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीप दौरा केला आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी कंपनीकडून विशेष ऑफर असलेले टूर पॅकेज लवकरच आणले जाईल, असंही निशांत पिट्टी यांनी म्हटलंय.

Web Title: After EaseMyTrip another major company insurance dekho boycot the Maldives not offering travel insurance pm modi comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.