Lokmat Money > बिझनेस न्यूज > घसरणीनंतर चांदी पुन्हा चार हजाराने वधारली

घसरणीनंतर चांदी पुन्हा चार हजाराने वधारली

सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 01:54 AM2020-08-14T01:54:34+5:302020-08-14T01:54:49+5:30

सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

After falling, silver rose again by 4,000 | घसरणीनंतर चांदी पुन्हा चार हजाराने वधारली

घसरणीनंतर चांदी पुन्हा चार हजाराने वधारली

जळगाव : चांदीत बुधवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुरुवारी पुन्हा चार हजार रुपयांनी वाढ होऊन ती ६७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. अशाच प्रकारे सोन्यातही एक हजार ७५० रुपयांनी वाढ होऊन ते ५३ हजार ४५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. सट्टा बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने पुन्हा भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सट्टा बाजारामुळे सुवर्ण बाजार अस्थिर झाला असून, यामुळे सोने-चांदीत चढ-उतार होत आहे. त्यात रशियाने कोरोनावरील लसीची घोषणा केल्यानंतर सट्टा बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला. परिणामी बुधवारी चांदीमध्ये १२ हजार रुपयांनी तर सोन्यात चार हजार रुपयांनी घसरण झाली. मात्र गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी दलालांनी खरेदी वाढविल्याने चांदीचे भाव पुन्हा वाधारले.

सुवर्ण व्यावसायिक चिंतित
सलग भाववाढीचा गेला आठवडा-वगळता गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. आता पुन्हा बुधवारी घसरण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी सोने-चांदीचे भाव वधारले. या सततच्या भाववाढीने सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत.
 

Web Title: After falling, silver rose again by 4,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.