Join us  

ब्रेक्झिटच्या भीतीनंतर बाजार तेजीने झेपावला

By admin | Published: July 04, 2016 5:32 AM

ब्रेक्झिटच्या प्रारंभिक धक्कयातून बाजार सावरला असून अतिशय कमी किंमतीत उपलब्ध असणारे समभाग खरेदी करणे सुरू झाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये काहीशी तेजीची लाट दिसून आली

ब्रेक्झिटच्या प्रारंभिक धक्कयातून बाजार सावरला असून अतिशय कमी किंमतीत उपलब्ध असणारे समभाग खरेदी करणे सुरू झाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये काहीशी तेजीची लाट दिसून आली. या जोडीलाच देशांतर्गत आशादायक घटना-घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या कमी झालेल्या किंमती आणि डॉला आणि येनमधील वाढलेले व्यवहार यांचाही परिणाम झाला. परिणामी शेअर बाजार निर्देशांक सुमारे तीन टक्कयांनी वाढून बंद झाला.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहसंपूर्णपणे तेजीचाच राहिला. बाजारात झालेल्या पाचही दिवसांच्या व्यवहारांमध्ये निर्देशांक वाढतच राहिला. अखेरीस तो २७ हजारांची पातळी ओलांडून २७१४४.९१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ७४७.२० अंश म्हणजे २.८३ टक्के वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.९६ टक्के म्हणजे २३९.७५ अशांंनी वाढून ८३२८.२५ंवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ झाली.बे्रक्झिटबाबतची प्रारंभिक भीती कमी झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजार आता सावरू लागले आहेत. ब्रिटनच्या निर्णयानंतर झालेल्या घसरणीमुळे अनेक चांगले समभाग आकर्षक किंमतीत उपलब्ध असल्याने त्यांच्या खरेदी करिता बाजारात गर्दी झालेली दिसून आली. मुंबई शेअर बाजारतही परकीय संस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून तेजीला हात दिला. त्या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिजतेलाच्या किंमतींमध्ये घट झाल्याने खरेदीचा उत्साह दुणावलेला दिसून आला.अनुकूल आंतरराष्ट्रीय वातावरणाबरोबरच देशातील वातावरणही आर्थिक क्षेत्राला अनुकूलच राहिले. जून महिन्यात देशातील उत्पादनामध्ये तीन महिन्यांमधील उच्चांकी वाढ झाली. तसेच मे महिन्यात पर्चेस मॅनेजर्स निर्देशांकामध्येही वाढ झाली. या जोडीलाच भारतीय रिझर्व्ह बॅँकेने देशाची अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्याने कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिल्याने गुंतवणुकदारांनी निर्धास्तपणे खरेदी केलेली दिसून आली.ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर युरो आणि पाऊंड या दोन्ही चलनांमधील अस्थिरता लक्षात घेऊन चलन बाजारात गुंतवरुकदारांनी डॉलर आणि येनच्या खरेदीला पसंती दिलेली आढळून येत आहे. यामुळे रुपयाच्या मूल्यामध्ये फारसा बदल दिसून आला नाही.यंदा मान्सून चांगला होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केल्याने बाजारात पुन्हा एकदा उत्साह आला आहे. त्याचबरोबर व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये जीएसटी विधेयक संमत होण्याचा व्यक्त केलेला आशावादही लाभदायक ठरला.>आठवड्यातील घडामोडीब्रेक्झिटची प्रारंभिक भीती ओसरल्याने जगभरातील बाजारांमध्ये वाढ परकीय वित्तसंस्थांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदीजूनमध्ये देशातील उत्पादनामध्ये तीन महिन्यांतील उच्चांकी वाढमे महिन्यामध्ये पीएमआयमध्येही वाढयुरो आणि पाऊंडमधील अनिश्चिततेमुळे येन आणि डॉलरमधील व्यवहार वाढले.