Lokmat Money > बिझनेस न्यूज > गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार

नवरात्रोत्सव  मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 06:19 PM2023-10-11T18:19:47+5:302023-10-11T18:20:38+5:30

नवरात्रोत्सव  मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे.

After Ganeshotsav, Tata Power will provide electricity at residential rates to the mandals during Navratri festival as well | गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरचा दिलासा, मंडळांना निवासी दरात वीज देणार

मुंबईगणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही टाटा पॉवरने दिलासा दिला आहे, मंडळांना निवासी दरात वीज देणार असल्याची घोषणा टाटा पॉवरने केली आहे. आता नवरात्रोत्सव  मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटा पॉवरने मागील वर्षाच्या आकड्यांवर आधारित  नवरात्रोत्सव  मंडळाशी आधीच संपर्क साधला आहे.आणि त्यांना अधिकृत कनेक्शन घेण्यास प्रोत्साहित केले आहे. टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरुपात नवरात्रोत्सव  मंडळाना वीजजोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे.

एलआयसीवरील कर थकबाकी, जीएसटी प्राधिकरणाने नोटीस बजावली, दंडही आकारला

नवरात्रोत्सव मंडळे टाटा पॉवर ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरित्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना- हरकत प्रमाणपत्र आणि चाचणी अहवाल यासारख्या किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त,या व्यतिरिक्त, मंडळे टाटा पॉवरला  मिस्ड कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून वीजजोडणी घेऊ शकतात 

टाटा पॉवर केवळ नवरात्रोत्सव मंडळांना तात्पुरते वीज जोडणी देत नाही, तर त्यांना सुरक्षा ऑडिट आणि देखरेख  ठेवूनही मदत करत आहे. सुरक्षेशी संबंधित सत्रांद्वारे जनजागृती करत असताना,  सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आहे.

Web Title: After Ganeshotsav, Tata Power will provide electricity at residential rates to the mandals during Navratri festival as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.