Join us

HDFC नंतर आता 'या' मोठ्या बँकेचं होणार विलीनीकरण, जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 10:51 AM

IDFC First Bank-IDFC Merger: आयडीएफसी आणि आयडीएफसी फायनॅन्सच्या मर्जरला मंजुरी देण्यात आली आहे. 

IDFC First Bank-IDFC Merger: नुकतंच एचडीएफसीबँक आणि एचडीएफसीचं विलीनीकरण पार पडलं. यानंतर आता आणखी एक मोठी विलीनीकरण प्रक्रिया पार पडणार आहे. आता आयडीएफसी आणि आयडीएफसी फायनॅन्स होल्डिंगच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. हे मर्जर या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.

आयडीएफसी लिमिटेड (IDFC Ltd) आणि आयडीएफसी फायनॅन्शिअल होल्डिंग (IDFC Financial Holding Company) कंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या विलीनीकरणाच्या रेश्योला १५५:१०० निश्चित करण्यात आलाय. याचाच अर्थ आयडीएफसीच्या १०० शेअर्सच्या मोबदल्यात आयडीएफसी फर्स्ट बँकेते १५५ शेअर्स दिले जातील. आयडीएफसी फर्स्ट बँकेनं शेअर बाजाराला याची माहीती दिली आहे. या विलीनीकरणामुळे बँकेला मजबूतीसह अधिक मोठं होण्यास मदत मिळणार आहे.

वर्षभरात मर्जर पूर्ण होणारदरम्यान, मर्जरनंतर बँकेचे प्रति शेअर बुक व्हॅल्यूमध्ये ४.९ टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती बँकेनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे मर्जर पूर्ण करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत आयडीएफसी फर्स्ट बँकेची एकूण संपत्ती २.४ लाख कोटी होती. कंपनीचा टर्नओव्हर२७,१९४.५१ कोटी रुपये होता. तर बँकेला २४३७.१३ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.

टॅग्स :बँकएचडीएफसी