Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंडेनबर्गनंतर आता फोर्ब्स; अदानींचा FPO संशयाच्या भोवऱ्यात, आपल्याच कंपन्यांद्वारे पैसे लावल्याचा दावा

हिंडेनबर्गनंतर आता फोर्ब्स; अदानींचा FPO संशयाच्या भोवऱ्यात, आपल्याच कंपन्यांद्वारे पैसे लावल्याचा दावा

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:08 PM2023-02-02T17:08:03+5:302023-02-02T17:11:00+5:30

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

After Hindenburg now Forbes There s Evidence That The Adani Group Likely Bought Into Its Own 2 5 Billion dollars Share Sale | हिंडेनबर्गनंतर आता फोर्ब्स; अदानींचा FPO संशयाच्या भोवऱ्यात, आपल्याच कंपन्यांद्वारे पैसे लावल्याचा दावा

हिंडेनबर्गनंतर आता फोर्ब्स; अदानींचा FPO संशयाच्या भोवऱ्यात, आपल्याच कंपन्यांद्वारे पैसे लावल्याचा दावा

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमधील चढ-उतार पाहता कंपनीच्या संचालक मंडळाने FPO रद्द केला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही FPO तून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार समाप्त करणार आहोत अशी माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिली. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर आता फोर्ब्सचा एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये अदानींच्या ३२० हजार कोटी रुपयांच्या एफपीओबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय.  

24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आला होता. या अहवालात गौतम अदानी यांच्या समूहावर शेअर बाजारातील फेरफाराचे आरोप करण्यात आले होते. अहवालात अदानी समूहावर बाजारातील हेराफेरी, अकाउंटिंग फ्रॉडसारखे आरोप करण्यात आले होते. यानंतर अदानींना 48 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. दरम्यान, अदानी एंटरप्राईजेसच्या एफपीओला मॅनेज करण्यासाठी ज्या १० कंपन्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यातील दोन कंपन्या अशा आहेत, ज्यांचा उल्लेख हिंडनबर्गच्या रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. कथितरित्या शेअर्समध्ये फेरफार करण्यासाठी अदानी समूहाची मदत करणाऱ्या दोन कंपन्या अदानी एन्टरप्राईजेसच्या एफपीओमध्ये अंडरराईटर होत्या, असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय.

या दोन कंपन्यांचा उल्लेख?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार लंडन बेस्ड गुंतवणूक फर्म एलारा कॅपिटलची सहाय्यक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि एक भारतीय ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ लिमिटेडद्वारे विक्रीच्या आपल्या प्रस्तावांच्या करारातील १० अंटरराईटर्समधील दोन होते. एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ लिमिटेडची भागीदारी, याबाबत प्रश्न उपस्थित करते की अदानींनी कोणत्याही वैयक्तिक फंडला २.५ अब्ज डॉलर्सचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या मदतीसाठी लावलं होतं का? असंही यात नमूद करण्यात आलंय.

सिटीग्रुपचे एक माजी गुंतवणूक बँकर आणि ऑस्ट्रेलिया स्थित क्लायमेट एनर्जी फायनॅन्सचे संचालक टीम बकल म्हणतात की वास्तवात हा मुद्दा सोडवण्याची एक पद्धत आहे की हे सर्व शेअर्स कोणी खरेदी केली. आपल्याला ते अंतर्गत व्यक्तींनीचं केल्याचं वाटत असल्याचा दावा त्यांनी केलाय. अदानी समूह, एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचंही फोर्ब्सनं म्हटलेय.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांनुसार, एलारा कॅपिटलच्या इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडकडे अदानींच्या कंपन्यांमधील ३ अब्ज डॉलर्सचे पब्लिकली शेअर्स होते.  त्यात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचाही समावेश आहे. हिंडनबर्गने कथितरित्या आरोप केला आहे की ही कंपनी भारतीय नियमांचे उल्लंघन करून अदानींच्‍या "स्टॉक पार्किंग एंटिटी" पैकी एक म्हणून काम करते. अदानी एंटरप्रायजेसने एफपीओ स्टेटमेंटमध्ये या दोन्ही कंपन्यांचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, एलारा कॅपिटलला एफपीओमध्ये मसुदा तयार करणे आणि मंजूरी संबंधित जबाबदाऱ्या देण्यात आल्या. तर, मोनार्ककडे गुंतवणूकदारांसाठी गैर-संस्थात्मक विपणनाचे काम सोपविण्यात आले होते.

एफपीओ मागे
"आमच्या FPO ला पाठिंबा आणि संधी दिल्याबद्दल सर्व गुंतवणूकदारांचे बोर्ड आभार मानते. FPO मंगळवारी यशस्वीरित्या बंद झाला. गेल्या आठवड्यात स्टॉकमधील अस्थिरता असूनही कंपनी, त्यांचा व्यवसाय आणि त्यांचे व्यवस्थापन तुमचा विश्वास अतिशय आश्वासक आहे,” असं बुधवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हणाले.

काय असतो FPO?
FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे कुठल्याही कंपनीसाठी पैसे जमा करण्याची एक पद्धत आहे. जी कंपनी पहिल्यापासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असते ती गुंतवणूकदारांना नवे शेअर ऑफर करते. हे शेअर बाजारातील उपलब्ध असणाऱ्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.  

Web Title: After Hindenburg now Forbes There s Evidence That The Adani Group Likely Bought Into Its Own 2 5 Billion dollars Share Sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.