Join us

iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 1:10 PM

काही दिवसांपूर्वी आयफोन १६ च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर या देशानं आता गुगल पिक्सल फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. जाणून घ्या काय आहे यामागील कारण

काही दिवसांपूर्वी आयफोन १६ (Apple iPhone 16) च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर इंडोनेशियानेही गुगल पिक्सल (Google Pixel Smartphones) फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत सामग्रीची आवश्यकता पूर्ण न केल्यामुळे इंडोनेशियानं गुगल पिक्सल स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

जोपर्यंत इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ४० टक्के स्थानिक सामग्रीचा वापर केला जात नाही, तोपर्यंत गुगलचे स्मार्टफोन देशात विकले जाणार नाही, असं इंडोनेशियाच्या उद्योग मंत्रालयानं म्हटलं. गुगलला पुन्हा विक्री सुरू करण्यापूर्वी स्थानिक सामग्री प्रमाणपत्र घेणं आवश्यक असेल, असं उद्योग मंत्रालयाचे प्रवक्ते फॅबरी हेंड्री अँटनी आरिफ यांनी स्पष्ट केलं. 

इंडोनेशियाच्या नियमांनुसार, कंपन्यांना हँडसेट आणि टॅब्लेटसाठी आवश्यक असलेली ४० टक्के कम्पोनन्ट्स देशातीलच वापरणं आवश्यक आहे. स्थानिक उत्पादन, फर्मवेअर डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन प्रोजेक्टमध्ये थेट गुंतवणुकीद्वारे या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे या गरजा पूर्ण करत आहेत.

यापूर्वी आयफोनवरही बंदी

यापूर्वी इंडोनेशियानं आयफोन १६ वर बंदी घातली होती. जर कोणीही इंडोनेशियामध्ये आयफोन १६ वापरत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. असं आढळल्यास सरकारला याची माहिती द्यावी, असं आवाहन इंडोनेशियाचे उद्योगमंत्री अगुस गुमिवांग कार्तासस्मिता यांनी यापूर्वी केलं होतं. अ‍ॅपलनं इंडोनेशियामध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन पूर्ण न करणं हे या बंदीचं कारण आहे. कंपनीनं वचन दिलेल्या १.७१ ट्रिलियन रुपियापैकी फक्त १.४८ ट्रिलियन रुपिया (सुमारे ९५ दशलक्ष डॉलर) गुंतवणूक केली आहे. ही रक्कम त्यांनी आश्वासन दिलेल्या रकमेपेक्षा कमी आहे.

टॅग्स :गुगलस्मार्टफोन