Vodafone Idea Tariff Hike : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेलपाठोपाठ (Bharti Airtel) आता व्होडाफोन आयडियानेही (Vodafone-Idea) आपल्या मोबाइल रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने शुक्रवारी २८ जून रोजी प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लानची घोषणा केली. हे नवे प्लान्स ४ जुलैपासून लागू होतील. व्होडाफोन आयडियानं टॅरिफमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली. कंपनीनं आता २८ दिवसांसाठी आपला मिनिमम रिचार्ज प्लॅन १७९ रुपयांवरून १९९ रुपयांपर्यंत वाढवला आहे. तर २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा असलेल्या प्लानची किंमत २६९ रुपयांवरून २९९ रुपये करण्यात आली आहे.
कंपनीने ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज १.५ जीबी प्लानची किंमत वाढवून ८५९ रुपये केली आहे, जी पूर्वी ७१९ रुपये होती. तर दररोज २ जीबी च्या प्लॅनची किंमत ८३९ रुपयांवरून ९७९ रुपये करण्यात आली आहे.
तर व्होडाफोन आयडियाने आपल्या ३६५ दिवसांच्या वार्षिक प्लानची किंमत ३४९९ रुपये केली आहे, जी आतापर्यंत २,८९९ रुपये होती. डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये कंपनीने १ जीबी डेटाची किंमत १९ रुपयांवरून २२ रुपये केली आहे, तर ६ जीबी डेटाची किंमत ३९ रुपयांवरून ४८ रुपये केली आहे.
हेही वाचा - जिओनं वाढवलं युझर्सचं टेन्शन! जुलैपासून २५ टक्के वाढणार मोबाईल रिचार्ज; चेक करा डिटेल्स
काय म्हटलं कंपनीनं?
४जी चा अनुभव आणखी सुधारण्यासाठी तसंच ५जी सेवा सुरू करण्यासाठी पुढील काही तिमाहीत मोठ्या गुंतवणुकीची योजना आखत आहे. एन्ट्री लेव्हल युजर्सचा विचार करून कंपनीनं आपल्या एंट्री लेव्हल प्लॅनच्या किंमतीत किमान वाढ केली आहे, असं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. यापूर्वी रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंदेखील आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.
हेही वाचा - जिओपाठोपाठ एअरटेलचाही ग्राहकांना 'जोर का झटका'; टॅरिफ प्लान्समध्ये केली मोठी वाढ, पाहा नवे दर