Join us

रिलायन्स जिओच्या 'या' मोठ्या निर्णयाने झाली एअरटेल, Viच्या शेअर्सची घसरगुंडी!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 23, 2020 9:39 PM

एअरटेलचे शेअर्स बुधवारी 10 टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्सनी 423.95 रुपयांच्या खालच्या स्तरालाही स्पर्ष केला होता. तर, व्यवहाराच्या अखेरीस 8.81 टक्क्यांच्या घसरणीची नोंद करण्यात आली. याच वेळी व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये 14.05 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

नवी दिल्ली - भारतीय बाजारात सध्या टेलिकॉम कंपनी एअरटेल आणि जिओ यांच्यात जबरदस्त स्पर्धा बघायला मिळत आहे. बुधवारी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi)च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे दिसून आले. तर रिलायन्सचे शेअर वधारले आहेत. हा परिणाम रिलायन्स जिओने पाच पोस्टपेड प्लस प्लॅन्सची घोषणा केल्याने झाला.

एअरटेलचे शेअर्स बुधवारी 10 टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्सनी 423.95 रुपयांच्या खालच्या स्तरालाही स्पर्ष केला होता. तर, व्यवहाराच्या अखेरीस 8.81 टक्क्यांच्या घसरणीची नोंद करण्यात आली. याच वेळी व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये 14.05 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स जिओच्या जबरदस्त पोस्टपेड प्लॅन्सच्या घोषणेमुळेच एअरटेल आणि व्होडा-आयडियाच्या शेयर्समध्ये घसरण झाल्याचे बोलले जात आहे. जिओच्या या नव्या प्लॅन्समुळे एअरटेल आणि व्होडा-आयडियासमोर मोठे आव्हान असणार आहे.

CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'?

रिलायन्स जिओने 399 रुपयांपासून ते 1,499 रुपयांपर्यंत नवे पोस्टपेड प्लॅन्स आणण्याची घोषणा केली आहे. जिओच्या या पोस्टपेड प्लॅन्समध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. याशिवाय इतर फायदेही ग्राहकांना मिळणार आहे. जिओ पोस्टपेड प्लस जिओ स्टोर्स आणि होम डिलिव्हरीसह 24 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. याच बरोबर जिओ 650+ लाइव्ह TV चॅनल्स, व्हिडिओ काँटेट्स, 5 कोटी गाणे आणि 300+ न्यूजपेपर्ससह जिओ अॅप्स सर्व्हिसेसदेखील ऑफर करण्यात येत आहे. 

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

नवे जिओपोस्टपेड प्लॅन्स संपूर्ण कुटुंबासाठी फॅमिली प्लॅनसह येणार आहेत. यात प्रत्येक कनेक्शनसाठी 250 रुपये द्यावे लागतील. याच बरोबर यात 500GBपर्यंत डेटा रोलओव्हर आणि भारत, तसेच परदेशात वायफाय कॉलिंगची सुविधाही मिळेल.

या शिवाय एअरटेल आणि व्होडा आयडियाच्या शेयर्सवर एजीआर पेमेंट प्रकरणाचाही दबाव आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत टेलीकॉम कंपन्यांना एजीआर स्वरुपात किमान 12,921 कोटी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. यात 80 टक्के रक्कम भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला भरायची आहे. कुठल्याही प्रकारचे एजीआर थकीत नसणारी रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोनआयडिया