Lokmat Money > बिझनेस न्यूज > Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 

Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 

Khyati Global Ventures IPO Listing: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:49 AM2024-10-11T10:49:11+5:302024-10-11T10:49:11+5:30

Khyati Global Ventures IPO Listing: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते.

after listing the lower circuit to Khyati Global Ventures shares the disappointment of investors no profit listing gain | Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 

Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 

Khyati Global Ventures IPO Listing: एफएमसीजी आणि फार्मा उत्पादनांचे परदेशात पाठवणाऱ्या ख्याती ग्लोबल व्हेंचर्सच्या शेअर्सनी आज बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री केली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते. आज बीएसई एसएमईवर तो १०५.०० रुपयांवर पोहोचला, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना ६.०६ टक्के लिस्टिंग नफा (Khyati Global Listing Gain) मिळाला. मात्र, त्यानंतर शेअर घसरल्यानं आयपीओ गुंतवणूकदारांचा आनंद अल्पावधीतच मावळला. तो ९९.७५ रुपयांच्या (Khyati Global Share Price) लोअर सर्किटवर घसरला म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदार आता ०.७६ टक्के नफ्यात आहेत.

आयपीओला उत्तम प्रतिसाद

ख्याती ग्लोबल व्हेंचर्सचा १८.३० कोटी रुपयांचा आयपीओ ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरावर या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि १५.१७ पट ओव्हरबाय झाला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव शेअरपैकी अर्धा हिस्सा २५.०० वेळा भरण्यात आला. या आयपीओअंतर्गत १०.३८ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. 

याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ८ लाख शेअर्स विकण्यात आले. ऑफर फॉर सेलचे पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. त्याचबरोबर नवीन शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरणार आहे.

Khyati Global Ventures बाबत माहिती

१९९३ मध्ये स्थापन झालेली ख्याती ग्लोबल व्हेंचर्स (पूर्वीची ख्याती अॅडव्हायझरी सर्व्हिसेस लिमिटेड) एमएमसीजी उत्पादनांचे पॅकिंग आणि निर्यात करते. तसंच परदेशात फार्मा उत्पादनांची निर्यात करते. त्याच्या ग्राहकांमध्ये घाऊक विक्रेते आणि सुपरमार्केटचा समावेश आहे. एव्हरेस्ट, पारले जी, एमडीएच, फॉर्च्यून, आशीर्वाद, गोवर्धन, बालाजी वेफर्स, हल्दीराम, हिमालय, डव्ह, कोलगेट, युनिलिव्हर, गोदरेज आदी उत्पादनांचा पुरवठा ४० हून अधिक देशांना केला जातो.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती सातत्यानं मजबूत करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २.०६ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.५३ कोटी रुपये झाला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक ५ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वाढीच्या दरानं (सीएजीआर) वाढून १०४.६४ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२४-२५ बद्दल बोलायचं झालं तर एप्रिल-जून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला ९४.६७ लाख रुपयांचा निव्वळ नफा आणि २७.१७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: after listing the lower circuit to Khyati Global Ventures shares the disappointment of investors no profit listing gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.