Lokmat Money > बिझनेस न्यूज > माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी

माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितनं टीम कुक यांच्यासोबत वडापाव खातानाचा फोटो शेअर केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:51 PM2023-05-01T18:51:53+5:302023-05-01T18:53:48+5:30

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितनं टीम कुक यांच्यासोबत वडापाव खातानाचा फोटो शेअर केला होता.

After Madhuri dixit tim cook her husband shriram nene enjyoed vada pav party with Paytm CEO in Mumbai | माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी

माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी

मुंबई, बॉलीवूड आणि वडापावऐवजी आजकाल मुंबई, उद्योगपती आणि वडापाव असं समीकरण पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा माधुरी दीक्षितसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो स्वाती स्नॅक्स नावाच्या रेस्टॉरंटमधील होता. त्या ठिकाणी माधुरी दीक्षित आणि टीम कुक दोघेही वडा पावाचा आस्वाद घेत होते. यानंतर आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात रेस्टॉरंटही तेच आहे - स्वाती स्नॅक्स. फरक म्हणजे यावेळी माधुरीच्या जागी तिचे पती श्रीराम नेने आहेत. तसंच पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी टीम कुकची जागा घेतली आहे.

पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी काही मित्रांसह या ठिकाणी बसून वडापावचा आनंद घेतला. याचा फोटो डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर शर्मा यांनी यावर मजेशीर कमेंटही केलीये. त्यांनी याला गरीब लोकांचा वडापाव मोमेंट असं म्हटलंय. यावर ट्वीटर युझर्सनंही कमेंट्स केल्यात. दररोज एक वडापाव हाच डॉक्टरांचा सल्ला आहे का? अशी कमेंट एका युझरनं केली आहे.

टीम कुक यांनीही घेतलेला आस्वाद 
टीम कुक जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा माधुरीनं त्यांच्यासोबत वडा पाव खातानाचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. मला माझ्या पहिल्या वडापावाशी ओळख करून दिल्याबद्दल माधुरी दीक्षितचे आभार. ते फार चविष्ट होते, असं टीम कुक म्हणाले होते. वडापाव खायला नेण्याशिवाय मुंबईत अन्य कोणत्याही बेस्ट वेलकमबाबत विचार केला जाऊ शकत नाही, असं माधुरी म्हणाली होती. 

Web Title: After Madhuri dixit tim cook her husband shriram nene enjyoed vada pav party with Paytm CEO in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.