Join us

मेस्सीच्या गोलनंतर रॉकेट बनला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आले 'अच्छे दिन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 4:21 PM

फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा परिणाम, त्या संघांना स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवरही झाला आहे.

FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूट-आऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. या विजयासह अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे अनेक वर्षांची प्रतीक्षाही पूर्ण झाली. काल सर्वांच्या नजरा मेस्सी आणि एमबाप्पे यांच्याखेळावर होत्या. याच बरोबर, या सामन्यादरम्यान सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष नायकी आणि आदिदासच्या शेअर्सवर होते. कारण Adidas अर्जेंटिना संघाला तर Nike फ्रेन्स संघाला स्पॉन्सर करतात. 

अर्जेंटिनाच्या विजयानंतर, आदिदासच्या शेअरने घेतलाय रॉकेट स्पीड -फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा परिणाम, त्या संघांना स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवरही झाला आहे. Adidas ची जर्सी परिधान केलेल्या अर्जेंटिना संघाच्या विजयानंतर कंपनीचा शेअर 1.93 टक्क्यांनी वधारून 121.30 युरो (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) वर बंद झाला. याच बरोबर, फ्रान्सचे खेळाडू नायकी जर्सी परिधान करून मैदानात उतरले होते. मात्र, फ्रान्स संघाच्या पराभवानंतर या कंपनीचा शेअर 1.96 टक्क्यांची घसरण होऊन 100 यूरोवर आला आहे.

आदीदासला 'अच्छे दिन'! या वर्षी आदीदासच्या शेअरमध्ये 53.26 टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली आहे. पण, विश्वचषक सुरू होण्याच्या काही दिवस आधी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. 3 नोव्हेंबरपासून आजपर्यंत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 28 टक्क्यांपेक्षाही अधिकची तेजी दिसून आली आहे.

टॅग्स :लिओनेल मेस्सीशेअर बाजारशेअर बाजारअर्जेंटिनाफ्रान्सफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२